शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मिटमिटावासी दहशतीखाली, अघोषित बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : कचरा टाकण्याच्या वादावरून बुधवारी उसळलेली दंगल, दगडफेक आणि पोलिसांच्या लाठीमारामुळे पसरलेली भीती व दहशतीचे ...

ठळक मुद्देअख्खी रात्र काढली जागून : मुलं, महिला घाबरलेल्या; पोलिसांनी घरात घुसून नासधूस केल्यांचा महिलांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कचरा टाकण्याच्या वादावरून बुधवारी उसळलेली दंगल, दगडफेक आणि पोलिसांच्या लाठीमारामुळे पसरलेली भीती व दहशतीचे सावट मिटमिट्यातील महिला, मुलांच्या मनात गुरुवारी घर करून होते. चिमुकले आपल्या आयांना बिलगून होते. बाबा कुठे गेले, कधी येणार, असा प्रश्नही ते विचारत होते. तोडफोड झालेल्या दुचाकी गल्लोगल्ली तशाच पडलेल्या होत्या. काहींच्या टायलेटचे दरवाजे, घरातील कपाटाच्या काचा, टीव्ही फोडले होते. पोलिसांनी ताब्यात घेतलेले व काही पोलीस भीतीने पसार झाल्याने बुधवारी रात्री गावात एकही पुरुष नव्हता. त्यामुळे महिला व मुलांनी अख्खी रात्र जागून काढली. गावात स्मशान शांतता पसरली होती. एकूणच मिटमिट्याचे दुसºया दिवशीचे चित्र विदारकच होते.पोलीस लाठीमाराच्या निषेधार्थ गुरुवारी मिटमिटा व पडेगाववासीयांनी कडकडीत बंद पाळल्याने या रोडवरील एकही दुकान उघडे नव्हते. मिटमिटा गावात तर गुरुवारी दिवसभर शुकशुकाट होता. गावात गल्लोगल्ली सर्वत्र दुचाकी पडलेल्या होत्या. त्यांचे हेडलाईट, पेट्रोल टाक्या, साईड इंडीकेटर आदी फोडलेले होते. गावात बोटावर मोजण्याइतकीच पुरुष मंडळी दिसत होती.पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा महिला संताप व्यक्त करीत होत्या. निर्मला परसने यांनी सांगितले की, घरात घुसून पोलिसांनी आम्हाला मारले. गावातील बहुतांश सर्व माणसांना अटक केली. आज महिलांनाही अटक करणार, अशी चर्चा सुरू झाल्याने दहशत पसरली आहे.घराबाहेर येण्यासही महिला, मुली घाबरत आहेत. पोलिसांनी घरात घुसून टीव्ही, कपाटाच्या काचा फोेडल्या, असे छाया मालोदे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, आमच्या घरात घुसून तोडफोड करणाºयांना पोलीस म्हणावे काय? या दहशतीने लहान मुले घाबरली आहेत. अनेक जण आज शाळेतही गेले नाही. सुजाता नरवडे यांनी सांगितले की, माझ्या पतीला बेदम मारत नेले, आमच्या बाथरूमचे दरवाजे तोडण्यात आले.कलाबाई नरवडे या ज्येष्ठ महिलेने सांगितले की, कालची घटना आठवली की, अजूनही अंगाचा थरकाप होतो. शकुंतला करपे म्हणाल्या की, अख्खी रात्र आम्ही जागून काढली. पूजा तिळवे ही महिला जेव्हा अपबिती सांगत होती तेव्हा तिची ४ वर्षांची मुलगी आई... डॅडी कुठे, घरी कधी येतील, असा प्रश्न विचारत होती. एकूणच संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण होते.शाळेऐवजी कचरा टाकण्याचा घाटपूजा तिळवे यांनी सांगितले की, मिटमिटा गावात मुख्य हायवेच्या पलीकडे शाळा आहे. रस्ता ओलांडताना दरवर्षी एका तरी मुलाचा अपघाती मृत्यू येथे होतो.यासाठी शाळेची जागा बदला, अशी आमची अनेक वर्षांपासून मागणी आहे. त्याऐवजी पालिकेने आमच्या गावात अख्ख्या शहराचा कचरा टाकण्याचा घाट घातला .