शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

अडीच लाख हेक्टर्सवरील पिकांवर कुळव

By admin | Updated: August 12, 2015 01:00 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात ७ ते १७ जून या कालावधीत सरासरी ८३ मि.मी. पाऊस झाला़ या पावसावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली असून,

लातूर : लातूर जिल्ह्यात ७ ते १७ जून या कालावधीत सरासरी ८३ मि.मी. पाऊस झाला़ या पावसावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली असून, त्यानंतर पावसाने ताण दिल्यामुळे पिके करपून गेली आहेत़ ५ लाख ५६ हजार ८६० हेक्टर्सपैकी ३ लाख ५८ हजार ५१५ हेक्टर्सवर पेरणी झाली़ त्यातील २ लाख ५० हजार हेक्टर्सवर कुळव फिरवला आहे़ तसेच जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पही कोरडेठाक पडले आहेत़ त्यामुळे जिल्ह्यात असलेल्या ६ लाख १५० पशुधनाच्या चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ उडीद, मुगाचा पेरा वाया गेला असून, २ लाख ५० हजार हेक्टर्सपैकी १ लाख ४७ हजार हेक्टर्सवरील सोयाबीन मोडीत निघाले आहे़ या पिकावर शेतकऱ्यांनी नांगर फिरवला आहे़ गेल्या तीन वर्षांपासून ही स्थिती असल्याने शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले आहे़ दरम्यान, केंद्राचे दुष्काळी पथक लातुरात पाहणी करण्यासाठी आले असून, या पथकाला तीन-चार गावांचा शिवार पाहून दुष्काळाची दाहकता समजणार आहे का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे़लातूर जिल्ह्यात ५ लाख ५६ हजार ८६० हेक्टर्स खरीपाचे क्षेत्र आहे. यापैकी ३ लाख ५८ हजार ५१५ हेक्टर्सवर पेरणी झाली आहे. या पेरण्यांचे प्रमाण ६४.४ टक्के आहे. सर्वाधिक सोयाबीनचा पेरा २ लाख ३६ हजार ९८७ हेक्टर्सवर झाला आहे. मात्र गेल्या पाच आठवड्यांपासून पाऊस झाला नाही. मृग नक्षत्र वगळता नंतर पाऊसच नाही. पावसाअभावी पिके करपली आहेत. चांगल्या जमिनीवरील पिकांनी तग धरली होती. परंतु, पावसाचा पत्ताच नाही. त्यामुळे ती पिकेही करपली आहेत. त्यामुळे पिके मोडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये सोयाबीन-१ लाख ४७ हजार, तूर-४०३१, सूर्यफुल-२०००, मका-३८०, बाजरी-२०० आदी १ लाख ५० हजार हेक्टर्सवरील पिके मोडीत काढली आहेत. लातूर तालुक्यात सोयाबीन १९०२, तूर २०१०, औसा तालुक्यात तूर ७००, सूर्यफुल ७००, मका ३८०, बाजारी २००, निलंगा तालुक्यात सोयाबीन ३०००, तूर ३२७, शिरूर अनंतपाळ तालुक्यात सोयाबीन २२५०, रेणापूर तालुक्यात ३२५०, तूर ४५०, चाकूर तालुक्यात सोयाबीन ९५००, तूर २६६४ असे एकूण जिल्ह्यात २ लाख ५० हजार हेक्टर्सवरील पिके मोडीत काढली आहेत. यामुळे शेतकरी कोलमडला असून, त्याला शासनाच्या मदतीची गरज आहे़