शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

८०० हून अधिक महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 00:02 IST

कन्नड उपविभागीय कार्यालयातील मंडळ अधिकारी आणि वाहनचालकावर गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्हा महसूल अधिकारी, कर्मचारी संघटनेने दुष्काळात कामबंद आंदोलन सुरूच ठेवले असून, सोमवारी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभाग नोंदविला.

ठळक मुद्देप्रशासन विरोधात संघटना : मतमोजणीतील कर्मचारी कार्यरत राहणार

औरंगाबाद : कन्नड उपविभागीय कार्यालयातील मंडळ अधिकारी आणि वाहनचालकावर गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्हा महसूल अधिकारी, कर्मचारी संघटनेने दुष्काळात कामबंद आंदोलन सुरूच ठेवले असून, सोमवारी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभाग नोंदविला.गुन्हे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहील. दुष्काळी उपाययोजना वगळता कोणत्याच कामांत महसूल कर्मचाºयांचा सहभाग राहणार नाही. शुक्रवारपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले असून, मागणी पूर्ण होईपर्यंत ते सुरूच राहणार असल्याचे तलाठी संघटनेचे राज्य सरचिटणीस अनिल सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच मतमोजणीच्या कामावर या कामबंद आंदोलनाचा काहीही परिणाम होणार नाही. इलेक्शन ड्यूटीवर सर्व कर्मचारी कार्यरत राहतील, असेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.सोमवारी २० मे रोजी सकाळी सर्व संघटनांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्यासोबत संघटनांची चर्चा झाली नाही. निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधवर यांच्यासोबत संघटनेने चर्चा केली. मात्र त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे संघटनेने कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. सकारात्मक तोडगा निघाला नाहीतर विभागीय आयुक्तांना भेटून निवेदन देण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.अप्पर जिल्हाधिकारी चौकशी करणारमंडळ अधिकारी, वाहनचालकावर गुन्हा दाखल झाला म्हणजे ते आरोपी होत नाहीत. कन्नड उपविभागीय कार्यालयातील प्रकरणात नेमके काय घडले आहे, याची अप्पर जिल्हाधिकाºयांकडून चौकशी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी १७ मे रोजी स्पष्ट केले होते. परंतु किती कालावधीत चौकशी पूर्ण होणार हे स्पष्ट केले नाही. जिल्हाधिकाºयांनी संघटनेशी तोंडी चर्चा केली आहे. संबंधित पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांचे निलंबन आणि मंडळ अधिकारी, वाहनचालकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे, असे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र गिरगे, सरचिटणीस अरविंद धोंगडे यांनी सांगितले.कामबंद आंदोलनाचा परिणामकामबंद आंदोलनाचा प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे. दुष्काळाचे कामकाज वगळता उर्वरित विभाग कर्मचाºयांविना ओस पडले होते. प्रशासनाने मात्र, सर्व कामकाज सुरळीत असल्याचा दावा केला. तलाठी, मंडळ अधिकारी, लिपिक, अव्वल कारकून, वाहनचालकांसह महसूल कर्मचारी संघटना, मध्यवर्ती कर्मचारी संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांचा कामबंद आंदोलनात समावेश आहे. चिकलठाणा तलाठी विशाल मगरे, मंडळ अधिकारी अप्पासाहेब गोरडे यांनी सांगितले, दुष्काळ नियोजन वगळता इतर महसुली विभागातील कर्मचारी आंदोलनात सहभागी आहेत.नेमके प्रकरण काय आहेबापू रिंढे याने गुरुवारी कन्नड उपविभागीय कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या आत्महत्येस मंडळ अधिकारी बी. एन. गवळी, वाहनचालक सुनील चिंधुटे जबाबदार असल्याचे कारण पुढे करीत पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. रिंढे यांच्या गळफासाला महसूल कर्मचारी जबाबदार नाहीत. त्याच्या नातेवाईकाच्या तोंडी मागणीवरून हा गुन्हा दाखल केला गेला. पोलीस निरीक्षकांना प्रकरण हाताळता आले नाही, त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी संघटनेची मागणी आहे. महसूल प्रशासन आणि पोलीस यांच्यातील अंतर्गत वादामुळे हा सगळा प्रकार घडल्याची चर्चा आहे.------------

टॅग्स :Aurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादStrikeसंप