सेलू : शहरातील राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएममध्ये वारंवार बिघाड होत आहे. तसेच रक्कम वेळेवर भरली जात नसल्यामुळे ग्राहक वैतागले आहेत़ सेलू शहरात स्टेट बँक आॅफ हैदराबाद व स्टेट बँक आॅफ इंडिया या दोन राष्ट्रीयकृत बँकेने एटीएम सुरू केले़ त्यामुळे ग्राहकांची एटीएम केंद्रावर रक्कम काढण्यासाठी गर्दी वाढत गेली़ परंतु, हैदराबाद बँकेच्या एटीएम केंद्रात दोन यंत्र बसविण्यात आले़ मात्र एक यंत्र नेहमीच बंद असते़ तर दुसर्या यंत्रावर अधिकचा भार येत असल्यामुळे काही तासांतच त्यातील रक्कम संपते़ त्यामुळे ग्राहकांना इतर केंद्रावर जावे लागते़ इंडिया बँकेने नुकतेच एटीएम केंद्र सुरू केले़ मात्र या ठिकाणीही कॅश नसल्यामुळे ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे़ एटीएम असल्यामुळे अनेक ग्राहक या सुविधेचा लाभ घेतात़ त्यातच बँकेला सुटी असल्यानंतर एटीएम केंद्रावर गर्दी वाढते़ परंतु, या एटीएममध्ये नेहमी तांत्रिक बिघाड तर कधी रक्कम लागलीच संपल्यामुळे ग्राहक अडचणीत सापडत आहेत़ संबंधित बँक व्यवस्थापन एटीएम केंद्र सुरळीत राहण्यासाठी गांभीर्याने पाहत नाही़ कॅश संपल्यानंतरही तासन्तास कॅश भरल्या जात नाही़ तसेच बिघाड झाल्यानंतर दुरुस्तीलाही वेळ लागतो़ शहरातील या दोन केंद्रावर गर्दी पाहता या ठिकाणी सेवा सुरळीत देणे आवश्यक आहे़ परंतु, वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे या बँकेचे ग्राहक वैतागले आहेत़ (प्रतिनिधी)स्टेट बँक आॅफ हैदराबाद एटीएम केंद्रात दोन यंत्र बसविण्यात आले आहेत़ मात्र यातील एक यंत्र नादुरुस्त आहे़ त्याची दुरुस्ती अनेक दिवसांपासून करण्यात आली नाही़ त्यामुळे दुसर्या यंत्रावर ग्राहकांची गर्दी होते़ काही वेळातच सदर यंत्रातील रक्कम संपते़ त्यामुळे ग्राहकांना इतर एटीएम केंद्राकडे धाव घ्यावी लागते़ दरम्यान स्टेट बँक आॅफ हैदराबाद शाखेजवळच एटीएम केंद्र आहे़ मात्र रक्कम संपल्यानंतरही तासन्तास याकडे बँक व्यवस्थापन पाहत नाही, हे विशेष़
सेलूत एटीमचा झाला खेळखंडोबा
By admin | Updated: May 28, 2014 00:32 IST