शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

जलकुंभावर चढले, पुतळे जाळले अन अंगावर रॉकेल ओतून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:21 IST

औरंगाबाद: दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल अपशब्द काढणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी करीत ...

औरंगाबाद: दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल अपशब्द काढणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी करीत प्रहार जनशक्ती पक्षाचे २५ ते ३० कार्यकर्ते गुरूवारी दुपारी अचानक शिवाजीनगर येथील जलकुंभावर चढले. पोलीस आणि जनतेचे लक्ष वेधून घेत त्यांनी दानवे यांचे दोन पुतळे जाळले. एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून घेतले, परंतु अन्य कार्यकर्त्यांनी त्याला रोखले. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची जोरदार घोषणाबाजी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी १२ वाजेपासून शिवाजीनगर जलकुंभावर आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी धाव घेतली. आंदोलकाशी चर्चा करण्यासाठी ते जलकुंभावरुन चढू लागले. मात्र आंदोलक आक्रमक झाल्याने त्यांना तेथून परतावे लागले. आंदोलकापैकी काही जण कपडे काढून घोषणा देत होते तर काही जण तेथे पडलेले प्लास्टीक कुलरचे खोके आणि लाकडी बॉक्स जाळून लक्ष वेधून घेत होते. आंदोलनात सुधाकर शिंदे, बाळू भोसले, अमोल ढगे, दीपक चिकटे, राम गाडेकर, मंगेश साबळे, सुदाम गायकवाड, यांच्यासह सुमारे २५ ते ३० कार्यकर्ते सहभागी झाले होते.

==================

चौकट

काय आहेत मागण्या - शेतकरीविरोधी काळे कायदे तात्काळ रद्द करा.

-दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाविषयी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी.

============

चौकट

पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांची शिष्टाई असफल

पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहाय्यक आयुक्त निशीकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी शिवाजीनगर येथे धाव घेतली. त्यांनी आंदोलकांना खाली उतरण्याचे आवाहन केले. मात्र आंदोलकांनी त्यांचे ऐकले नाही.

=============

जलकुंभावर जेवण आणि झोपण्यासाठी कंबळ

जलकुंभावर चढून दुपारी १२ वाजता सुरू झालेले आंदोलन मागण्या मान्य न झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आंदोलकांनी जलकुंभावर पिण्याच्या पाण्याचे जार नेले. रात्री ९:३० वाजता ९ ते १० आंदोलक खाली उतरले आणि उर्वरित आंदोलकांसाठी जेवण घेऊन गेले. थंडीचा त्रास होऊ नये याकरिता आंदोलकांना कंबळ देण्यात आल्या.

========

पोलिसांसमोर पुतळे नेऊन जलकुंभावर जाळले

खाली असलेल्या आंदोलकांना पकडले तर जलकुंभावरील आंदोलक टोकाचे पाऊल उचलतील, अशी पोलिसांना भीती होती. पोलिसांसमोर आंदोलकांनी दानवे यांचे दोन पुतळे जलकुंभावर नेले. पोलिसांनी त्यांना अडविले नाही. जलकुंभावर पुतळे नेऊन जोरदार घोषणा देत जाळले.

==========

जलकुंभाखाली पोलिसांचा खडा पहारा

विनंती करुनही आंदोलक जलकुंभावरुन खाली उतरत नसल्यामुळे शेवटी पोलिसांनी जलकुंभाखाली राहुटी लावून तेथे खडा पहारा सुरू ठेवला.