शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

शहर पोलीस, उच्च न्यायालय, कम्बार्इंड बँकर्स विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 11:19 IST

एमजीएम मैदानावर सुरूअसलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस ब, उच्च न्यायालय वकील, कम्बार्इंड बँकर्स अ संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. आज झालेल्या सामन्यात प्रीतेश चार्ल्स, प्रल्हाद बचाटे व गौरव गंगाखेडकर सामनावीर ठरले.

औरंगाबाद : एमजीएम मैदानावर सुरूअसलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस ब, उच्च न्यायालय वकील, कम्बार्इंड बँकर्स अ संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. आज झालेल्या सामन्यात प्रीतेश चार्ल्स, प्रल्हाद बचाटे व गौरव गंगाखेडकर सामनावीर ठरले.आज झालेल्या पहिल्या लढतीत अमित पाठक याने ५१ चेंडूंतच ८ टोलेजंग षटकार व ६ चौकारांसह केलेल्या ९१ धावांच्या स्फोटक खेळीच्या बळावर एमजीएम अ संघाने २0 षटकांत १६७ धावा ठोकल्या. अमितसह अमरदीप असोलकरने १९ व रहीम खान याने १५ धावा केल्या. शहर पोलीसकडून प्रीतेश चार्ल्सने ३३ धावांत ३ गडी बाद केले. अहमद शेख व अलीम शेख यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात शहर पोलीस संघाने विजयी लक्ष्य १७.४ षटकांत पूर्ण केले. त्यांच्याकडून प्रीतेश चार्ल्सने ४0 चेंडूंतच ७ उत्तुंग षटकार व ९ चौकारांसह ९१ धावांची निर्णायक खेळी केली. अजिम शेखने १९ धावा केल्या. एमजीएम अ कडून अब्दुल शमीने २0 धावांत ३ तर रहिमने २ व अमित पाठकने १ गडी बाद केला.दुसऱ्या सामन्यात वैद्यकीय प्रतिनिधी ई संघाविरुद्ध उच्च न्यायालय संघाने २0 षटकांत ५ बाद १५0 धावा केल्या. त्यांच्याकडून राहुल जाधवने ५ चौकारांसह ४0, श्रीसागर अंबिलवादीने ३७ व ज्ञानेश्वर पाटीलने १८ धावा केल्या. वैद्यकीय प्रतिनिधी संघाकडून आवेज पटेल, उबेद खान, मोहंमद अयाजुद्दीन, जावेद सय्यद यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात वैद्यकीय प्रतिनिधी अ संघ १३.२ षटकांत ६३ धावांत गारद झाला. त्याच्याकडून सय्यद जावेदने २४ धावा केल्या. उच्च न्यायालय संघाकडून प्रल्हाद बचाटे याने ९ धावांत ५ तर सचिन जैस्वालने ३ व पवन इप्पार आणि निखिल राजे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.तिसºया सामन्यात कम्बार्इंड बँकर्सने २0 षटकांत १६८ धावा केल्या. त्यांच्याकडून गौरव गंगाखेडकरने २ षटकार व ११ चौकारांसह ७९, जावेद शेखने २३, मिलिंद पाटीलने २२ व रवी शेरेने १६ धावा केल्या. महावितरण ब संघाकडून बाळासाहेब मगरने १८ धावांत ३ गडी बाद केले. कैलास शेळके, अनिकेत काळे, संजय बनकर, अतिक खान यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात महावितरण ब संघ १९.२ षटकांत १४३ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून संतोष आवाळेने ६ चौकारांसह ३९, बाळासाहेब मगरने ३८ धावा केल्या. कम्बार्इंड बँकर्सकडून दिनेश कुंटे व जावेद शेख यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. यासाठी त्यांनी अनुक्रमे २८ व १५ धावा मोजल्या. मिलिंद पाटील, हिरल शाह, महेंद्रसिंग कानसा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.