शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

शहरात गरज १५ हजार डोसची, मिळतात केवळ दोन हजार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी केंद्र शासनाने जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात केली. प्रारंभी नागरिकांकडून लसीकरणाला अजिबात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी केंद्र शासनाने जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात केली. प्रारंभी नागरिकांकडून लसीकरणाला अजिबात प्रतिसाद नव्हता. आता नागरिकांचा याला उदंड प्रतिसाद मिळत असताना शासनाकडून लस मिळत नसल्याचे चित्र आहे. एकट्या औरंगाबाद शहराला दररोज किमान १५ हजार लसीची गरज असताना, शासनाकडून फक्त एक ते दोन हजार लस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर लांबलचक रांगा लागत आहेत.

१८ ते ४४ वयोगटासाठी शासनाकडून अत्यंत कमी प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरात दररोज अकराशे ते बाराशे जणांना लस दिली जात आहे. ४५पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी लस उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे महापालिकेला एक दिवस लसीकरण केल्यानंतर आठ दिवस मोहीम बंद ठेवावी लागत आहे. शासनाकडून मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून दिली जात नसल्यामुळे ही विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाकडून आठवड्यातून एक किंवा दोन दिवस लस देण्यात येत आहे. ५ ते १० हजारांपेक्षा जास्त लस दिली जात नाही. मागील दीड महिन्यांपासून लसीकरणाचा हा खेळ सुरू आहे. शनिवारी बऱ्याच दिवसानंतर महापालिकेने ४५ वर्षांपेक्षा पुढील नागरिकांसाठी नोंदणी न करता लसीकरण सुरू केले. त्यामुळे नागरिकांनी अलोट गर्दी केली. यावेळी दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य देण्यात येत होते.

शहरात ६ सेंटर सुरू

१८ ते ४४ वयोगटासाठी सहा केंद्र काही दिवसांपासून सुरू करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर फक्त दोनशे जणांना लस देण्यात येते. ४५पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी शासनाकडून लस उपलब्ध करून देण्यात आली तर २२ ते २५ लसीकरण केंद्र सुरू ठेवण्यात येतात. लस संपताच केंद्र पुढील अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येते. या प्रकाराला सर्वसामान्य नागरिक प्रचंड कंटाळले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन नागरिक लस घेत होते. शासनाने खासगी रुग्णालयांमध्ये सुरू असलेले लसीकरणही बंद केले.

नागरिक वैतागले

केंद्र आणि राज्य शासन लसीकरणासंदर्भात मागील काही दिवसांपासून अक्षरशः टोलवाटोलवी करत आहे. शासनाने सरसकट लसीकरण सुरू करावे. ज्या नागरिकांना पैसे देऊन लस घ्यायची आहे, त्यांना खासगी रुग्णालयात पाठवावे. मात्र, नागरिकांचा चेंडू करू नये, ही विनंती.

राजीव वनारसे

कोणत्याही सरकारला नागरिकांच्या जीवाची काळजी नाही. नागरिकांच्या जीवाची काळजी असती तर अशा पद्धतीने लसीकरणाचा खेळ मांडला नसता. महामारीत नागरिकांचा जीव वाचविण्याला प्राधान्य दिले पाहिजे. मात्र, असे प्रयत्न होताना सरकारकडून दिसून येत नाहीत, ही अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल.

कल्पना त्रिभुवन

१८ ते ४५ वयोगटातील नागरिकांनी शासनाच्या कोविन ॲपवर नोंदणी केली तरच लस मिळत आहे. नोंदणीसाठी हजारो नागरिक दिलेल्या निर्धारित वेळेत प्रयत्न करतात. त्यातील बोटावर मोजण्याएवढ्या नागरिकांना यश मिळते. उर्वरित नागरिकांना दररोज रात्री नोंदणीसाठी अथक परिश्रम घ्यावे लागत आहेत.

दत्ता पाटील.

१८पेक्षा जास्त, दुसरा डोस तिसऱ्या ठिकाणी

१८ ते ४४ वय असलेल्या नागरिकांसाठी वेगळे निकष लावण्यात येत आहेत. पूर्वी नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आली. जेव्हा दुसरा डोस घेण्याची वेळ आली तेव्हा संबंधितांना या केंद्रावर जा, त्या केंद्रावर जा, अशी टोलवाटोलवी सुरू झाली. मागील काही दिवसांपासून शहरातील जवळपास ४० हजार नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरा डोस वेळेवर न मिळाल्यास पहिला डोस वाया जाण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

लसीकरण सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत

लसीकरण करताना ४५पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांचे जागेवरच रजिस्ट्रेशन करून घेण्यात येते. या किचकट प्रक्रियेला बराच वेळ लागतो. त्यामुळे लसीकरण मोहीम लवकर राबविणे शक्य होत नाही. अनेक नागरिकांना आजही शासनाच्या कोविन ॲपवर नोंदणी करता येत नाही. त्यामुळे अनेक नागरिक सकाळपासूनच लसीकरण केंद्रावर रांगा लावून बसत आहेत.

३७,०१,२८२

जिल्ह्याची लोकसंख्या

२,५०,०२४

आतापर्यंत शहरात लसीकरण

१,९४,४११

पहिला डोस

५५,६१३

दुसरा डोस

३९,७७२

हेल्थलाईन वर्कर

४४,१४६

फ्रन्टलाईन वर्कर

१,३०,८३६

एकूण कोरोना रुग्ण

१,१९,११७

कोरोनामुक्त

८७,२८१

५९पेक्षा जास्त (विविध आजार)

३,२५१

१८ ते ४५ वय

लसीकरण ९ टक्के