शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

औरंगाबादकरांच्या सेवेत आजपासून महानगरपालिकेची शहर बस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 12:15 IST

मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादकर दर्जेदार शहर बसची वाट पाहत होते.

ठळक मुद्दे रात्री १० वाजेपर्यंत या बसेस धावतील. दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी फक्त ५ रुपये आकारण्यात येतील.

औरंगाबाद : मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादकर दर्जेदार शहर बसची वाट पाहत होते. आज सकाळी ५.३० वाजेपासून २५ शहर सुरु झाल्या. सकाळी ९ वाजता पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद , महापौर नंदकुमार घोडेले , उपमहापौर विजय औताडे , मनपा आयुक्त निपुण विनायक यांनी १० रुपयांचे तिकीट घेऊन औरंगपुरा ते रेल्वे स्टेशन असा प्रवास स्मार्ट बस मध्ये केला .

शहर बसच्या अभावामुळे नागरिकांना शहरांतर्गत प्रवास करतांना प्रचंड त्रास सहन  करावा लागत असे. शहराच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे जायचे असल्यास अ‍ॅपे, रिक्षाचालक प्रवास्यांना वेठीस धरत मनमानी भाडे आकारून लूट करीत असत. अवाच्या सव्वा पैसे देऊन नागरिकांना प्रवास करावा लागत होता. स्मार्ट सिटी योजनेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यावर केंद्र शासनाने भर दिला आहे. या उपक्रमांतर्गत महापालिकेने तब्बल १०० बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील २५ बस मनपाला प्राप्त झाल्या आहेत. या प्रकल्पावर महापालिकेने स्मार्ट सिटीतील किमान ३६ कोटी रुपये खर्च केले आहेत.

 

अत्यंत कमी भाडे असणार शहर बसमधील दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी फक्त ५ रुपये आकारण्यात येतील. शहराच्या आसपासच्या छोट्या-छोट्या गावांपर्यंत स्मार्ट बस जाईल, असे नियोजन करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजेपासून ही सेवा एस. टी. महामंडळ देणार आहे. रात्री १० वाजेपर्यंत या बसेस धावतील. सर्व प्रमुख रस्त्यांवर पाच ते दहा मिनिटांमध्ये नागरिकांना शहर बस उपलब्ध होईल, यादृष्टीने एस. टी. महामंडळाने सूक्ष्म नियोजन केले आहे. शहराबरोबरच वाळूज, रांजणगाव, बजाजनगर, हर्सूल-सावंगी, चिकलठाणा, नक्षत्रवाडी, सातारा-देवळाई, हिंदुस्थान आवासपर्यंत बसेस धावणार आहेत.

काही जागा आरक्षितस्मार्ट बसेसमध्ये स्वातंत्र्यसैनिक, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.  एस. टी. महामंडळाप्रमाणे सर्व सवलती देण्यात आल्या आहेत. स्मार्ट बस ३२ आसनी असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा, पॅनिक बटन, अग्निशमन यंत्रणा बसविलेली आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाpassengerप्रवासीSmart Cityस्मार्ट सिटी