शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शहरात महिनाभरात शिजते ५०० क्विंटल खिचडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:33 IST

रेस्टॉरंट ते पंचतारांकित हॉटेलमध्येही डाळ खिचडीचा तडका खवय्यांना तृप्त करीत असतो. म्हणूनच तर शहरात दर महिन्याला ५०० क्विंटल खिचडी शिजते.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एरव्ही दररोजच्या जेवणात असणारी खिचडी आता ‘ग्लोबल ब्रॅण्ड’ म्हणून ओळखली जाणार आहे. पर्यटनाच्या राजधानीत घराघरांतच नव्हे, तर रेस्टॉरंट ते पंचतारांकित हॉटेलमध्येही डाळ खिचडीचा तडका खवय्यांना तृप्त करीत असतो. म्हणूनच तर शहरात दर महिन्याला ५०० क्विंटल खिचडी शिजते.घरातील लहानांपासून थोरांपर्यंत ‘खिचडी’ ही लोकप्रिय पाककृती होय. देशात असा कोणताच भाग नाही की, तेथील लोक खिचडी खात नाहीत. म्हणून तर ‘खिचडी’ला भारताच्या विविधतेतील एकतेचे प्रतीक मानले जाते. देशात भात खाणाºयांची संख्या कमी नाही त्याचप्रमाणे ‘डाळ- खिचडी’चा आस्वाद घेणाºयांची संख्याही काही कमी नाही. रेस्टॉरंटमध्ये थाली प्रकारात ‘डाळ-खिचडी व सोबतीला आंबटगोड कढी’ असा बेत असतोच. एवढेच काय शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्येही विदेशी पर्यटकही आवर्जून भारतीय ‘डाळ-खिचडी’ खाण्यास प्राधान्य देतात.रेस्टॉरंटचे मालक अशोक शहा यांनी सांगितले की, थाळी प्रकारात ‘डाळ-खिचडी’ने कायमचे स्थान मिळविले आहे. डाळ-खिचडी व त्यावर कढी खाल्ल्याशिवाय खवय्यांचे जेवण पूर्ण होतच नाही. केटरर्स किशोर लव्हेकर यांनी सांगितले की, लग्नसोहळेवगळता वाढदिवस, धार्मिक कार्यक्रमांत मूग-खिचडी, डाळ-खिचडी, साधी खिचडी, असे अनेक प्रकार आवर्जून केले जातात. कारण, खिचडी करण्यास जास्त वेळ लागत नाही व ती बनवणे सहजसोपे असते. हजारो लोकांना पुरेल एवढी खिचडी एकाच वेळी तयार करता येते. हॉटेल रामा इंटरनॅशनलचे शेफ दिनकर सरदेसाई म्हणाले की, पचण्यास हलका पदार्थ असल्याने विदेशी पर्यटकही खिचडी खाण्यास प्राधान्य देत असतात. त्यास मसालेदार खिचडी, गावरान तूप व जिरा तडका मारलेली खिचडीही आवर्जून खाल्ली जाते. तसेच कॉपोरेट क्षेत्रातील ग्राहकही घरगुती अन्नपदार्थ म्हणून खिचडीची मागणी करीत असतात.तांदळाचे होलसेल विक्रेते जगदीश भंडारी यांनी सांगितले की, खास खिचडीसाठी बासमती तुकडा, गुजरात बासमती व नाशिक येथील इंद्रायणी तांदळाला सर्वाधिक मागणी असते. दर महिन्याला शहरात फक्त खिचडीसाठी ५०० क्विंटल तांदूळ विकला जातो. यात सुमारे २ कोटींची उलाढाल होते.नीलेश सोमानी या व्यापा-याने सांगितले की, कालीमुछ तुकडा, अंबेमोहर तुकडा (चुरी) तांदळापासूनही खिचडी केली जाते.