शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘उज्ज्वला’ योजनेतील गॅस रिफिलिंगसाठी नागरिकांच्या चकरा; मजूर, कामगार कुटुंबियांची होतेय अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 19:15 IST

गॅस उपलब्ध नसल्याची उत्तरे एजन्सीसकडून मिळू लागल्याने या गॅस कनेक्शनचे सिलिंडर घेण्यासाठी नागरिकांच्या चकरा सुरू आहेत. 

- साहेबराव हिवराळे  

औरंगाबाद : गोरगरिबांच्या घरीदेखील गॅस असावा म्हणून उज्ज्वला योजनेंतर्गत अनेकांना मोफत गॅस देण्यात आला. मात्र, आॅनलाईनची सुविधा नसल्याने तसेच गॅस उपलब्ध नसल्याची उत्तरे एजन्सीसकडून मिळू लागल्याने या गॅस कनेक्शनचे सिलिंडर घेण्यासाठी नागरिकांच्या चकरा सुरू आहेत. 

दारिद्ररेषेखालील नागरिकांना आधार कार्ड व कागदपत्रांच्या आधारे शासनाकडून गॅस कनेक्शन देण्यात आले. गॅस घरी आला म्हणून सामान्य मजूर आणि कष्टकऱ्यांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, आता हा गॅस घेऊन अडचण झाल्याचे सामान्य नागरिकांना वाटत आहे. ज्या एजन्सीकडून गॅस कनेक्शन घेतले आहे, त्या एजन्सीतून गॅस आणण्यासाठी रिक्षाने ये-जा करावी लागते. यामध्ये गरिबांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. अनेक जण गॅस संपला म्हणून कार्ड घेऊन जातात. आॅनलाईन नोंद नसल्याने त्यांना सिलिंडर मिळत नाही. यामुळे रिकामे सिलिंडर घेऊन परत यावे लागते.

पुन्हा आठवडाभर मजुरी करून सुटीच्या दिवशी गॅस आणण्यासाठी नागरिक धाव घेत असल्याचे चित्र आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत दिवाळीला मिळालेल्या गॅसधारकांपैकी ५० टक्के लाभार्थ्यांचे सध्या तिसरे रिफिलिंग चालू आहे. घरपोच गॅस मिळत नाही आणि ठराविक मोबाईलवरून रिफिलिंगसाठी नोंदणी होते. अनेक लाभार्थ्यांना काही तांत्रिक अडचणींमुळे रिफिलिंग करता आलेले नाही. त्यामुळे गॅस कनेक्शन मिळाल्याचा आनंद असला तरी सिलिंडर मिळत नसल्याने गरिबांची अडवणूक होत असल्याची भावना या योजनेतील गॅसधारकांनी व्यक्त केली.  

लाभधारकांची गैरसोय टाळामोलमजुरी करणाऱ्यांना सिलिंडर वेळेवर आणि घरपोच मिळत नाही, अनुदानही त्यांच्या खात्यात आले नाही. पुरवठा विभागाने त्याकडे लक्ष देऊन अनुदान पोहोच करावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र बांधकाम संघटनेचे सलीम शहा यांनी केली आहे. 

गॅसचे अनुदान द्याकधी मनातही वाटले नव्हते की आपणदेखील गॅस वापरू; परंतु मोफत गॅस कनेक्शन मिळाले त्याचा आनंद आहे. सध्या तिसरी रिफिलिंग आहे. अद्यापही त्याचे अनुदान खात्यावर जमा झाले नसल्याचे मंदाबाई साखरे, रफिया बेग, मुमताज सय्यद, शशीकलाबाई साबळे आदींनी सांगितले.

गॅससाठी किती फेऱ्यामोबाईलवरून गॅसची बुकिंग करा तरच गॅस मिळेल, असे गॅस एजन्सीवाले सांगतात. रिक्षाने दोनदा १५ किलोमीटर जाऊन आलो. गॅस मिळाला नाही. गॅसची रिफिलिंग इतरांप्रमाणे घर पोहोच मिळावी, अशी मागणी मीनाबाई दुधाने यांनी केली. 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाWomenमहिलाFamilyपरिवार