शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनो, यंदाही स्वातंत्र्यदिनी घरावर फडकवा तिरंगा; पण 'या' नियमांचे पालन करा

By विजय सरवदे | Updated: August 11, 2023 15:44 IST

देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर : गेल्या वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या अभियानाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेता यंदाही स्वातंत्र्य दिनी हे अभियान राबविण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांमार्फत सर्व सरपंच, ग्रामसेवकांना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार राज्य सरकारने १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस सर्वांनी आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन केले होते. प्रत्येक नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत झाली पाहिजे, या अभियानामागचा उद्देश आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील नागरिकांना घर, कार्यालये आणि शाळांच्या इमारतींवर तिरंगा ध्वज फडकावण्याचे आवाहन केले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला होता.

यावेळी फक्त १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी तिरंगा ध्वज फडकावण्याचे जि.प. प्रशासनाने आवाहन केले आहे. यासाठी ज्या कुटुंबाची क्षमता नसेल, त्यांना ग्रामपंचायत स्वत:च्या निधीतून झेंड्यांचा पुरवठा करू शकते. यासाठी प्रशासनाकडून निधी तरतूद करण्यात आलेली नाही, असे जि.प. प्रशासनाने कळविले आहे.

या नियमांचे पालन कराध्वजारोहण करताना तिरंग्याचा सन्मान राखावा. कधीही फाटलेला अथवा खराब झालेला ध्वज लावू नये. तिरंगा ध्वज उलटा फडकला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. ध्वजारोहण करताना केशरी रंग सर्वात वर असावा. राष्ट्रध्वज झुकलेला नसावा, याशिवाय तिरंगा ध्वजाच्या आजूबाजूला इतर कोणताही ध्वज त्यापेक्षा उंच अथवा त्याच्याबरोबरीने नसावा. ध्वजारोहण करताना त्याला कधीही जमीन अथवा पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नका.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIndependence Dayस्वातंत्र्य दिन