शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

घरे वाचविण्यासाठी नागरिक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:14 IST

रांजणगाव शेणपुंजी येथे घरे वाचविण्यासाठी नागरिक एकवटले असून, या संदर्भात रविवारी अतिक्रमणधारकांची बैठक घेण्यात आली.

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथे घरे वाचविण्यासाठी नागरिक एकवटले असून, या संदर्भात रविवारी अतिक्रमणधारकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत मालमत्तेचे पुरावे गोळा करुन उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

वाळूज औद्योगिक वसाहत क्षेत्रातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या रांजणगाव शेणपुंजी गावातील अनेकांनी शासकीय गायरान व महार हाडोळा जमिनीवर अतिक्रमणे करुन पक्की घरे बांधली आहेत. येथील शासकीय गट क्रमांक २, ५५,७५, ७६, ७७,७८, ७९, ८२, ८३ व ८४ मधील जमिनीवर जवळपास ४ हजार घरे बांधली आहे. दरम्यान, हे अतिक्रमण हटविण्यासाठी सामाजिक कायकर्ते शेख सिंकदर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचे आदेश दीड महिन्यापूर्वी दिले आहेत.

तसेच ग्रामपंचायतीने अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरु केली आहे. विशेष म्हणजे या जागेवर ग्रामपंचायत कार्यालय, जि.प. शाळा, अंगणवाड्या, खाजगी शाळा आदीसह हजारो नागरिकांची घरे आहेत. याच बरोबर अनेकांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरु केले आहेत. या संदर्भात कायदेशीर लढा उभारण्यासाठी शिवसेनेचे विभाग प्रमुख कैलास हिवाळे यांनी पुढाकार घेत रविवार अतिक्रमणधारकांची बैठक घेतली. यात अ‍ॅड. आर.यू.हनवते यांनी न्यायालयाच्या आदेशाविषयीची माहिती देवून उपस्थितांच्या शंकाचे निरसन केले. बैठकीला कैलास हिवाळे, गोरखनाथ लोहकरे, रावसाहेब भोसले, शिवराम ठोंबरे, भगवान साळुंखे, शेख जावेद, प्रदिप सवई, राजेश उनवणे आदींसह सुमारे ४०० नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :WalujवाळूजEnchroachmentअतिक्रमण