शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

‘आपला दवाखाना’ वाटतोय नागरिकांनाच परका! काही दवाखाने स्थलांतरित करण्याची नामुष्की

By विजय सरवदे | Updated: June 21, 2023 16:42 IST

ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, या हेतूने प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर : मोठा गाजावाजा करीत शिंदे सरकारने महाराष्ट्रदिनी ‘आपला दवाखाना’ ही योजना राज्यभरात सुरू केली खरी; पण, औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांना अद्याप ती पचनी पडलेली दिसत नाही. आपल्या परिसरात हा दवाखाना नको, या मानसिकतेतून नागरिकांचा विरोध होत असल्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागावर काही दवाखाने स्थलांतरित करण्याची वेळ आली आहे.

ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, या हेतूने प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करण्यात आली. आता वाढत्या शहरीकरणाचा व विस्तारित शहरांचा विचार करता गोरगरीब रुग्णांना सामान्य आजारांसाठी तत्काळ आरोग्य तपासणी व उपचाराची सुविधा मिळावी म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने ‘आपला दवाखाना’ ही योजना सुरू केली. पहिल्या टप्प्यात दोनशे दवाखान्यांना मान्यता दिली होती. सत्तांतरानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेला गती दिली. १ मे २०२३ रोजी राज्यात हे दवाखाने सुरू झाले. औरंगाबाद जिल्ह्यात २९ दवाखाने सुरू करण्यास मान्यता मिळाली. यात तालुक्याच्या ठिकाणी १५, मनपा हद्दीत १२ आणि छावणी परिसरात २ दवाखान्यांचा समावेश आहे.

मात्र, दीड- पावणेदोन महिन्यांत या योजनेने फारसी गती घेतलेली दिसत नाही. आतापर्यंत ९ तालुक्यांत १५ पैकी फक्त ७ दवाखाने सुरू झाले आहेत. कन्नड आणि वैजापूर तालुक्यात नगरपरिषदेच्या समाजमंदिरात सुरू झालेल्या या दवाखान्यास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविल्यामुळे हे दवाखाने स्थलांतरित केले जाणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नगरपरिषदेच्या मालमत्ता विभागाकडून इमारतीसाठी भाडेदर ठरवून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी नगरपरिषद, नगरपंचायत मालकीच्या इमारतींची दुरुस्ती झाल्यानंतर तिथे हे दवाखाने सुरू होतील. फुलंब्री व सोयगाव येथे शनिवारी हे दवाखाने सुरू होतील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी सांगितले.

या आहेत सुविधादुपारी २ ते रात्री दहापर्यंत या दवाखान्यांमध्ये रुग्ण तपासणी करण्यात येते. तसेच रुग्णांना मोफत औषधोपचार केला जाणार आहेत. गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी, लसीकरण, महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, मानसिक आरोग्य विषयक समुपदेशन तसेच आवश्यकतेनुसार विशेषज्ञांच्या संदर्भ सेवा- सल्ला उपलब्ध करून देण्यात येत आहे.

जिल्ह्यात दवाखान्यांची स्थितीतालुका- सुरू झाले- प्रतीक्षेतकन्नड- ०१- ०२वैजापूर- ०१- ०२सिल्लोड- ०२ - ००पैठण- ०१- ०१गंगापूर- ०१- ०१सोयगाव- ००- ०१खुलताबाद- ०१- ००फुलंब्री- ००- ०१

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरAurangabadऔरंगाबाद