शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

जलवाहिनी न टाकता सिडकोने केली नागरिकांची फसगत

By admin | Updated: July 3, 2014 00:57 IST

विकास राऊत , औरंगाबाद सिडको झालर क्षेत्रविकास आराखड्यातून माघार घेत असल्यामुळे एकप्रकारे जनतेचे नुकसान होणार आहे.

विकास राऊत , औरंगाबादसिडको झालर क्षेत्रविकास आराखड्यातून माघार घेत असल्यामुळे एकप्रकारे जनतेचे नुकसान होणार आहे. १९७२ मध्ये जेव्हा सिडकोने शहरात मुहूर्तमेढ रोवली. त्यावेळी नागरिकांना पाणीपुरवठ्याची स्वतंत्र व्यवस्था करण्याचे आश्वासन सिडको प्रशासनाने दिले होते. मात्र, ३४ वर्षे सिडकोने नागरिकांना झुलवत ठेवून मनपाकडे हस्तांतरण केले. २००६ साली झालेल्या हस्तांतरणामुळे ३२ हजार मालमत्ताधारकांची एकप्रकारे फसगतच झाली आहे. सिडको-हडकोवासीयांना पाण्यासाठी मनपाकडे भांडण्याची वेळ अलीकडच्या काळामध्ये वारंवार येत आहे. हस्तांतरणानंतर २२ वॉर्डांच्या सिडको-हडको परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे सुविधांची वानवा आहे. याप्रकरणी सिडको प्रशासनाला विचारले असता अधिकाऱ्यांनी हात वर करू न मुख्यालयाकडे बोट दाखविले. सिडकोच्या निर्मिती वेळी सिडकोने १०० घरांची सुरुवातीला निर्मिती केली. घरांसाठी ३ इंच जलवाहिनी देण्याचे ठरले होते. हळूहळू जशी घरे वाढली तशी पाणीपुरवठ्याची मागणी सुरू झाली. त्यानंतर ५०० घरांसाठी ६ इंची जलवाहिनी टाकण्यात आली. दिल्लीगेट येथे पंप बसवून पाणीपुरवठा सुरू केला. नांदेड, पनवेल, बेलापूर, वाशी या शहरांमध्ये पाण्याचे स्रोत सिडकोने दिले. मात्र, औरंगाबादेत सिडकोेने पाणीपुरवठ्याची स्वतंत्र व्यवस्था केली नाही. २४ तास पाणीपुरवठा करू, असा सिडकोने शब्द दिला होता. हस्तांतरण करतानाही कुणी त्याबाबत बोलले नाही. हस्तांतरणाची एकतर्फी प्रक्रिया पार पडली. एमआयडीसीकडून सिडकोने नागरिकांना पाणी पुरविले; पण येथून जाताना सिडकोने पाण्याचा स्रोत निर्माण केला नाही. सिडकोची पाण्याची गरज सिडको-हडकोसाठी २००१ मध्ये टाकण्यात आलेल्या एक्स्प्रेस जलवाहिनीचे २० एमएलडी म्हणजेच २० लाख लिटर पाण्याची चोरी होत आहे. नक्षत्रवाडी एमबीआर येथे एक्स्प्रेस जलवाहिनीवर लावण्यात आलेल्या वॉटरमीटरनुसार ४२ एमएलडी पाण्याची नोंद होत आहे. मुळात एन-५ च्या जलकुंभापर्यंत फक्त २२ एमएलडी पाणी येत असल्यामुळे सिडको-हडकोला पाणीपुरवठा होत नाही. सिडको-हडकोला ३५ एमएलडी पाण्याची गरज आहे. ६०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी टाकलीच नाही ६०० मि. मी. व्यासाची स्वतंत्र एक्स्प्रेस जलवाहिनी टाकण्याचा शब्द सिडकोने नागरिकांना दिला होता. मात्र, सिडकोने ती जलवाहिनी टाकली नाही. शिवाय पाण्याचा स्वतंत्र स्रोतही निर्माण केला नाही. अंतर्गत जलवाहिन्या सिडकोने टाकल्या आहेत. मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सिडकोने करणे गरजेचे होते. ४० ते ५० एमएलडी पाणी सिडकोने उपलब्ध करून दिले असते तर आजघडीला शहर व सिडको, अशी भांडणे झाली नसती. - एच. आर. ठोलिया, सेवानिवृत्त अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अनियमित पाणीपुरवठाजुन्या जलवाहिन्यांवरूनच आजही पाणीपुरवठा सुरू आहे. २००१ मध्ये टाकण्यात आलेली एक्स्प्रेस जलवाहिनीही अपुरी पडते आहे. दोन दिवसाआड अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे वॉर्ड ‘ब’ कार्यालयावर नागरिकांच्या शिष्टमंडळांच्या तक्रारींचा वर्षाव होतो आहे. दोन दिवसांपूर्वी जलवाहिनी टाकण्याच्या कामावरून एन-७ येथील कार्यालयाला नागरिकांनी कुलूप ठोकले.