शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी गटनंबरमध्ये प्लॉट खरेदी न करण्याचे सिडकोचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 18:04 IST

वाळूज महानगर : सिडको अधिसूचित क्षेत्रात समाविष्ठ असलेल्या गावातील खाजगी गट नंबरमध्ये घरे व प्लॉट खरेदी करताना सर्वसामान्यांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे खाजगी गटनंबरमध्ये घरे व प्लॉट खरेदी करु नका, असे आवाहन सिडको प्रशासनाने केले आहे. सिडकोने सातबारा व नमुना नं. ८ - अ चे उतारे पाहून कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, काही लोक व ग्रामपंचायत रडारवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

वाळूज महानगर : सिडको अधिसूचित क्षेत्रात समाविष्ठ असलेल्या गावातील खाजगी गट नंबरमध्ये घरे व प्लॉट खरेदी करताना सर्वसामान्यांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे खाजगी गटनंबरमध्ये घरे व प्लॉट खरेदी करु नका, असे आवाहन सिडको प्रशासनाने केले आहे. सिडकोने सातबारा व नमुना नं. ८ - अ चे उतारे पाहून कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, काही लोक व ग्रामपंचायत रडारवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

सिडको अधिसूचित क्षेत्रात येणाऱ्या खाजगी जमिनीवर काही लोकांनी घरे व प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. तेथे सिडकोच्या परवानगी शिवाय खरेदी-विक्री व बांधकाम करता येत नाही. पण काही लोकांनी स्थानिक ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधीसह अधिकाºयांना हाताशी धरुन लेआऊट मंजूर करुन घेतली आहे.

सिडकोच्या परवानगी विनाच खुल्या प्लॉटची व घराची विक्री सुरु केली आहे. विशेष म्हणजे घराची स्थानिक ग्रामपंचायतीकडे नोंद करुन ८ - अ चे उतारेही घेतल्याचे उघडकीस येत आहे. मात्र, सिडकोने सदरील घरे व प्लॉट अनधिकृत असल्याचे जाहीर करुन कारवाईचा बडगा उगारला आहे.

या विषयी सिडकोचे मालमत्ता अधिकारी गजानन साटोटे म्हणाले की, या विषयी आम्ही संबंधित लोक व प्लॉटधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, या संदर्भात कुणीही खुलासा सादर न केल्यामुळे ज्यांची नियमबाह्य रजिस्ट्री झालेली आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन लवकरच गुन्हे दाखल केले जातील.

या गटनंबरमध्ये घरे व प्लॉट घेवू नकासिडको प्रशासनाने अधिसूचित क्षेत्रात येणाºया वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ३, ४, ५, ७, ८, ९, १०, ११, १२ व शरणापूर ग्रामपंचायत हद्दीतील शेकापूर (उढाण) येथील गट क्रमांक ५ व ६ मध्ये भूखंड अथवा जमीन सिडकोच्या परवानगीशिवाय न घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. याविषयी तहसीलदार व दुय्यम निबंधक यांनाही या भागातील खरेदी-विक्रीची नोंद न घेण्याचे कळविले आहे.

अधिकाºयांकडून पाहणीसिडकोचे मुख्य प्रशासक मधुकर आर्दड यांनी पथकासह या भागाची पाहणी केली. यात अनधिकृत भूखंड खरेदी-विक्री व्यवहार व बांधकाम सुरु असल्याचे दिसून आले. याच बरोबर रजिस्ट्री व नमुना नं. ८ अ चे उतारे मिळून आले. त्यामुळे प्रशासनाने सातबारे व नमुना नं. ८ अ चे उतारे जमा करुन दोषींविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबाद