शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

कुत्र्यांसाठी लावला चक्क पिंजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2016 11:55 PM

औरंगाबाद : मानवी वस्त्यांमध्ये वाघ, बिबट्या यांसारख्या वन्यप्राण्यांनी घुसखोरी केल्यावर त्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला जातो.

औरंगाबाद : मानवी वस्त्यांमध्ये वाघ, बिबट्या यांसारख्या वन्यप्राण्यांनी घुसखोरी केल्यावर त्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला जातो. पिंजऱ्यात अडकण्यासाठी त्यांना मांसाची लालूच दाखविली जाते. अगदी याच पद्धतीने चिकलठाणा विमानतळावर पिंजरा लावण्यात आला आहे; परंतु एखाद्या वन्यप्राण्यासाठी हा पिंजरा लावलेला नसून विमानतळाच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या मोकाट कुत्र्यांसाठी लावण्यात आला आहे.चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीतून वाहणारी नाली आणि संरक्षक भिंतीजवळ बांधण्यात आलेल्या घरांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. विमानतळाच्या हद्दीतून वाहणाऱ्या तीन नाल्यांमुळे संरक्षक भिंतीजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचतो, तर संरक्षक भिंतीजवळील अनेक घरांमधून थेट विमानतळाच्या हद्दीत घाण आणि कचरा टाकण्यात येत आहे. विमानतळाच्या भिंतीला लागूनच मांसाची विक्री केली जाते. विक्रीनंतर उरलेले मांसही भिंतीलगत टाकण्यात येते. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या शोधात परिसरातील कुत्री विमानतळाच्या हद्दीत घुसखोरी करीत आहेत. यातून अनेकदामोकाट कुत्री थेट धावपट्टीवर येतात. त्यामुळे विमानाच्या उड्डाणात अडथळा निर्माण होतो. यातून अपघाताचा धोका नाकारता येत नाही.विमानतळ प्राधिकरणाने यासंदर्भात वेळोवेळी महापालिकेकडे तक्रार केली आहे. महापालिकेच्या पथकाकडून मोकाट कुत्र्यांना पकडले जाते; परंतु हा प्रश्न कायम राहत आहे, अशा परिस्थितीत कुत्र्यांना पकडण्यासाठी थेट पिंजरा लावण्यात आला आहे. या पिंजऱ्यात कुत्री अडकण्यासाठी त्यामध्ये मांस ठेवले जाते. वन्यप्राण्यांप्रमाणे मोकाट कुत्री जेरबंद करण्याची वेळ येत आहे. मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये शुक्रवारी मोकाट कुत्र्यांनी १२ जणांचे लचके तोडले. या घटनेनंतरही शहरातील रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. कुत्र्याने चावा घेतल्यामुळे शनिवारी घाटी रुग्णालयात ११ जण उपचारासाठी दाखल झाले. यामध्ये शहरातील विविध भागांतील ८ जणांचा समावेश आहे.शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांकडून नागरिक, मुले, महिलांवर हल्ला होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यातही लहान मुलांवर हल्ला होण्याचे प्रकार अधिक आहेत. पुंडलिकनगर, गजानननगर भागांमधील पाच जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. तर याच दिवशी अन्य भागातील ९ जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला. शुक्रवारच्या घटनेची शनिवारीही पुनरावृत्ती झाली. कुत्र्याने चावा घेतल्याने दिवसभरात ११ जण घाटी रुग्णालयात दाखल झाले. यामध्ये चिश्तिया कॉलनी, जयसिंगपुरा, एन-२, मुकुंदवाडी, चिकलठाणा, बजाजनगर येथील रुग्णांना समावेश होता.शहरातील विविध भागांमध्ये मोकाट कुत्र्यांची टोळकी फिरताना दिसतात. येणारे-जाणारे पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या पाठीमागे ते लागतात. अशा वेळी दुचाकीचालकांकडून वेग अधिक केला जातो; परंतु या प्रयत्नात अपघात होण्याचेही प्रकार होत आहेत. त्यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.