लातूर : रेणापूर तालुक्यातील दिवेगाव येथील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून बलात्काराचा प्रयत्न करणारा आरोपी प्रभुराम डुकरे (६०) याला गावकऱ्यानी पकडून बेदम चोप दिला आहे़ यामध्ये आरोपी जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी लातूरच्या एका खासगी रूग्णालयात त्याच्या नातेवाईकांनी दाखल केले आहे़ दिवेगाव येथे इयत्ताा सहावीत शिकणारी मुलगी ही आपल्या शेताकडे जनावरांना चारा-पाणी करून घराकडे परत येत होती़ यावेळी वाटेत प्रभुराम डुकरे याने या मुलीचा विनयभंग करून बलात्काराचा प्रयत्न केला़ याप्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी बेदम चोप दिल्याने आरोपी जखमी झाला आहे़
विनयभंग प्रकरणातील आरोपीला चोप
By admin | Updated: March 5, 2017 00:31 IST