लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चीनमधील एका खाजगी कंपनीच्या अधिकाºयांचे शिष्टमंडळ औरंगाबाद दौºयावर आले होते. दोन दिवस औरंगाबादेत थांबून येथील घनकचरा प्रकल्प, दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासंबंधी शिष्टमंडळाने माहिती घेतली. चीनमधील नानीयांग या शहराला भेट द्यावी, तेथील कंपनीचे विविध प्रकल्प बघावे, असे निमंत्रण मनपा आयुक्तांसह अधिकाºयांना देण्यात आले. मनपानेही हे निमंत्रण स्वीकारले आहे.चीनमधील बॉसको कंपनी जगातील २१० देशांमध्ये दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम करते. कंपनीने पायलट प्रोजेक्ट म्हणून औरंगाबादेतही काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शुक्रवारी कंपनीचे अधिकारी ली सीयुआन, अभिजित चौधरी, हुआंग बिंगग्युई, श्रेया अग्रवाल यांनी मनपा अधिकाºयांना पॉवर पॉइंट प्रझेंटेशनद्वारे माहिती दिली. शनिवारीही चीनच्या शिष्टमंडळाने शहरात ठिकठिकाणी भेटी दिल्या. शिष्टमंडळासमोर सलीम अली सरोवरातील दूषित पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी एक पायलट प्रोजेक्ट राबवावा, असा प्रस्ताव ठेवला, तो कंपनीने मान्य केला.
चीनच्या शिष्टमंडळाचे मनपाला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:07 IST