शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

‘बिग बी’ समवेत चिमुकल्यांनी केली धमाल

By admin | Updated: July 31, 2014 00:48 IST

नांदेड: प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा बिग बी प्रत्यक्षात शाळेत अवतरल्याचे पाहून चिमुकल्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही़

नांदेड: प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा बिग बी प्रत्यक्षात शाळेत अवतरल्याचे पाहून चिमुकल्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही़ हुबेहूब दिसणाऱ्या ज्युनिअर अमिताभला मुलांच्या भेटीचा प्रसंग लोकमत बालविकास मंचने सोमवारी शहरात घडवून आणला़ रुपेरी पडद्याच्या माध्यमातून अँग्री ओल्ड मॅन अमिताभ बच्चनची जादू गत पाच दशकांहून अधिक काळापासून प्रत्येकाच्या मनावर कायम आहे़ अभिनेता, कवी या प्रतिमांपेक्षाही टीव्हीवरील केबीसी गेम शो मधील अमिताभ सर्वांना भावला़ याच कार्यक्रमातील प्रसिद्ध ओळ कॉम्युटरजी लॉक किया जाए म्हणत़़ ज्युनिअर अमिताभ बच्चनने नांदेड शहरातील काही निवडक शाळांना भेट दिली़ अँग्री ओल्ड मॅनची एन्ट्री झाल्यावर अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांची अमिताभला ओळखण्यात गल्लत झाली़ अगदी हुबेहूब देहबोली, चेहऱ्याची ठेवण, आवाजातील चढउतार, डायलॉग डिलीव्हरी यातील साम्य अनुभवण्याजोगे होते़ शहरातील केंब्रीज हायस्कूल, गुजरातील हायस्कूल, शिवाजी हायस्कूल, माधवराव पाटील शाळा, महात्मा फुले हायस्कूल आदी शाळांना ज्युनिअर अमिताभने भेट दिली़ बाबानगर येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये आगमन झाल्यावर खास शैलीत कौन बनेगा करोडपती ही मालिका लाईव्ह सादर करत एका विद्यार्थिनिला हॉटसिटवर बसवले़ विविध प्रश्नांची रंगीत तालिम विद्यार्थ्यांकडून त्यांनी करवून घेतली़ विविध नकला सादर करत खळखळून हसण्यास सर्वांना भाग पाडले़ तसेच पार्टी तो बनती है या गाण्यावर ताल धरत विद्यार्थ्यांनी त्यांना साथ दिली़ चिमुकल्यांच्या फर्माइश पूर्ण करत खुश तो बहोत होंगे आप, डॉन का इंतजार तो बारा मुल्को की पुलीस कर रही है़़़आदी डायलॉग सादर केले़ लहान मुलांच्या आवडत्या भूतनाथने आपल्या जादूने मुलांना चांगलीच भुरळ घातली़ लोकमत बालविकास मंचच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात़ शैक्षणिक माहिती, कलागुणांना चालना देण्याचे काम या माध्यमातून होते़ तेव्हा बालविकास मंचचे सदस्य व्हा, असे आवाहन ज्युनिअर अमिताभने आपल्या खास शैलीत केले़ लवकरच ही नोंदणी सुरु होणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)