शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

चिकलठाणा एमआयडीसीची दररोज वीज गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 23:17 IST

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत महिनाभरापासून दररोज एक ते तीन तास वीजपुरवठा बंद पडत असल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. तासन्तास मशीन बंद होत असल्याने वेळेवर आॅर्डर पूर्ण करून देता येत नसल्याने नवीन काम मिळण्यावर परिणाम होत आहे.

ठळक मुद्देपरिणाम : महिनाभरापासून उद्योजक त्रास्त, उत्पादनावर परिणाम

औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत महिनाभरापासून दररोज एक ते तीन तास वीजपुरवठा बंद पडत असल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. तासन्तास मशीन बंद होत असल्याने वेळेवर आॅर्डर पूर्ण करून देता येत नसल्याने नवीन काम मिळण्यावर परिणाम होत आहे.चिकलठाणा औद्योगिक वसाहत शासनाला कोट्यवधीचा महसूल देत आहे. मात्र, या परिसरात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण राहिले नाही. येथील उद्योजक पैसा लावण्यास तयार आहेत, अत्याधुनिक मशीन आहेत, कामगारही सज्ज आहेत; पण वीजपुरवठा नसल्याने सर्व काम ठप्प पडत आहे. मागील महिनाभरापासून दररोज कोणत्या ना कोणत्या फिडरवर एक ते तीन तास वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे कंपनीतील सर्व काम ठप्प पडत आहे. यासंदर्भात उद्योजक किशोर राठी यांनी सांगितले की, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत असंख्य अडचणींना तोंड देत येथील कंपन्या तग धरून आहेत. कोट्यवधीचा महसूल या परिसरातून शासनाला प्राप्त होतो; पण त्या तुलनेत या वसाहतीत मूलभूत सुविधा पुरविण्यात शासनाला अपयश येत आहे. दररोज येथील उद्योगांना नवनवीन समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मागील महिनाभरापासून या परिसरातील वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे वेळेवर उत्पादन तयार करून आॅर्डर पूर्ण करणे कठीण जात आहे. परिणामी, नवीन आॅर्डर मिळण्यास विलंब होत आहे. याचा परिणाम, येथील उलाढालीवर होत आहे. उद्योजक मनीष अग्रवाल म्हणाले की, दररोेज एक ते तीन तास वीजपुरवठा बंद पडला की, पुन्हा मशीन सुरू होऊन काम सुरळीत होण्यास एक ते दीड तास लागतो. यात विनाकारणच वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. तासन्तास कामगार बसून राहत आहेत. मागील अनेक दिवसांपासून महावितरण फॉल्ट शोधत आहे; पण यश येत नाही. लवकरात लवकर फॉल्ट शोधून वीजपुरवठा अखंडित करावा, असे आवाहन आम्हा सर्व उद्योगाजकांच्या वतीने करण्यात आले आहे.दिवसेंदिवस काम करणे कठीणमागील महिनाभरापासून कधी इंडस्ट्रिअल फिडर १, कधी फिडर २, तर कधी रेडिएन्ट फिडर, अशा तीन फिडरवरील वीजपुरवठा आलटूनपालटून बंद होत आहे. पूर्वी दिवसातून अर्धातास वीजपुरवठा खंडित होत असे. आता तो २ ते ३ तास खंडित होत आहे. महावितरणचे अंडरग्राऊंड काम सुरू आहे. यामुळे वीज खंडित होते, असे सांगितले जात आहे. पूर्वी शुक्रवारीच वीजपुरवठा बंद होईल, असे सांगण्यात आले होते. एखाद्या दिवशी ठीक आहे; पण दररोज वीजपुरवठा बंद पडत असल्याने कंपनी चालविणे कठीण झाले आहे.-अनुप काबरा,उद्योजक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीmahavitaranमहावितरण