शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

बालकांचा किलबिलाट सुरु

By admin | Updated: June 17, 2014 00:52 IST

नांदेड : मनपा, जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांना १६ जूनपासून शहर व जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. त्यामुळे पुन्हा ‘आई, मला सकाळी लवकर उठव,

नांदेड : मनपा, जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांना १६ जूनपासून शहर व जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. त्यामुळे पुन्हा ‘आई, मला सकाळी लवकर उठव, ‘आई, मला उद्या काय डबा देणार’ आदी वाक्य घराघरात सुरु होणार आहेत. आज पहिल्या दिवशी पुष्पगुच्छ, पुस्तके वाटप करुन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तर काही ठिकाणी प्रभातफेरीही काढण्यात आली. एकूणच शाळांमध्ये बच्चेकंपनीचा किलबिलाट पुन्हा सुरु झाला आहे.जवळपास दीड महिना उन्हाळ्याच्या सुट्या विद्यार्थ्यांना होत्या. या सुट्यात अनेकांनी धमाल केली. उत्तर भारत, दक्षिण भारत आदी ठिकाणी पालकासोबत जावून विद्यार्थ्यांनी सुट्यांचा मनमुरादपणे आनंद लुटला. काहीजण आपल्या काका, मामा, आजी- आजोबा, आत्या, मावशी आदींच्या गावालाही जावून आले. गावावहून परतल्यानंतर विद्यार्थी क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम आदी खेळांत रमले तर काही जणांनी घरातील संगणकावर आपला वेळ घालविला. उन्हाळी सुटी संपल्यानंतर आज प्रत्यक्ष शाळांना प्रारंभ झाला. शाळा सुरु होण्याची मानसीक तयारी तशी विद्यार्र्थींनी तीन दिवसापूर्वीच करुन ठेवली होती. शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध शालेय दुकाने विद्यार्थी, पालक यांच्या गर्दीने फुलले होते. ड्रेस खरेदीसाठीही विद्यार्थ्यांनी गर्दी केली. शाळेच्या पहिल्या दिवशी सोमवारी विद्यार्थ्यांच्या स्वागताचे कार्यक्रम विविध ठिकाणी घेण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचेही वाटप करण्यात आले. यानिमित्ताने नमस्कार अभियानही राबविण्यात आले. प्रथमच शाळेला जाणारे बालविद्यार्थी जड अंतकरणाने शाळेत जात होते. काही जण रडत होते, त्यांना समजावून सांगताना पालकांना अक्षरश: कसरत करावी लागत होती. एकूणच काही ठिकाणी आसू आणि काही ठिकाणी हसू, असेच काहीसे चित्र शाळांमधून पाहावयास मिळाले. लक्षवेधी नमस्कारइस्लापूर : येथील जि़प़ हायस्कूलमध्ये शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षकांकडून पूष्पगुच्छ देवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले़ याशिवाय लक्षवेधी नमस्काराचा कार्यक्रम झाला़ अध्यक्षस्थानी उत्तम चव्हाण होते़ प्रमुख पाहुणे म्हणून नारायण दंतलवाड, चंद्रकांत पाकलवाड, भाऊराव केशवे, उदय केंद्रे, पाटील, सूर्यवंशी, वट्टमवार, ठक्कर, जाधव, वाघमारे, ठिकाणे, शिराळ आदी उपस्थित होते़ प्रास्ताविक मुख्याध्यापक पांचाळ, सूत्रसंचालन सुभाष कऱ्हाड तर अनिल शिंदे यांनी आभार मानले़ तत्पूर्वी विद्यार्थ्यांची गावातून रॅली काढण्यात आली़ पूष्पगुच्छाने स्वागतबरबडा : या सर्कलमधील जिल्हा परिषद व संस्थांच्या शाळांना १६ जूनपासून प्रारंभ झाला़ विद्यार्थ्यांचे पूष्पगुच्छ देवून पुस्तकांचे वाटप करण्यात आले़ यानिमित्ताने गावातून फेरीही काढण्यात आली़ यावेळी मुख्याध्यापक ढुमणे, पाटील, बालाजी शेवाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबुराव घोसलवाड, सदस्य मदेवाड, ढेपे, यमलवाड, बिजमवार, विभुते, शिंगेवाड, मार्गेपकर मॅडम, सुरेवाड, उमरेकर, माहूरकर यांची उपस्थिती होती़उमरीत वाटपउमरी : शाळेच्या पहिल्याच दिवशी येथील नूतन विद्यालयात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले़ पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप प्राचार्य ए़ एस़ जाधव, मुख्याध्यापक आऱ एच़ पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले़ यावेळी प्रभाकर नामवाड, टी़ एस़ मनूरकर, एस़ व्ही़ देशमुख, बी़ एम़ सावंत, एम़ सी़ झाडे, शिलाताई चाटोरीकर, प्रतिभा गायकवाड, सुरेखा पेंडकर, वैशाली काटे, एम़ एस़ डोप्पलवार, बी़ डी़ जोगदंड आदी शिक्षकांसह भीमराव वाघमारे, जाधव, अनिल नेत्रगावकर आदी उपस्थित होते़ शालेय पुस्तके मांडवा : जि़पक़ें़ प्रा़ शाळा मांडवा (कि़) येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले़ कार्यक्रमाला गटविकास अधिकारी पी़ एम़ सूर्यवंशी, शिक्षण विस्तार अधिकारी आऱएल़ आडे यांची उपस्थिती होती़ यावेळी मुख्याध्यापक व्ही़पी़ ढाले, ज्येष्ठ नागरिक केरबा मुंडे, राजेश पुर्देवार, मुरलीधर मुंडे, रामु धुर्वे आदी उपस्थित होते़आमदुराचा उपक्रममुदखेड : आमदुरा येथील जि़प़शाळेने वर्षभर विविध उपक्रम घेतले़ पटनोंदणी, उपस्थिती, गुणवत्ता, गणवेश, एक मुल-एकझाड, वर्षभर नमस्कार, नेत्यांची जयंती-पुण्यतिथी, पालकांचे प्रबोधन, वनराई बंधारा, शैक्षणिक उपक्रम शाळेने राबविले़ यासाठी मुख्याध्यापिका खुर्शिदा बेगम, बाबासाहेब गुर्ले, राजेश कुरमुडे, शंकर गायकवाड, इंदुताई ढोले, स्रेहलता देशमुुख, रुपाली पांपटवार, विजयालक्ष्मी कंचर्लावार यांनी परिश्रम घेतले़पालकांचे स्वागतनांदेड : प्रतिभा निकेतन प्राथमिक / माध्यमिक शाळेत आलेल्या विद्यार्थी व पालकांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले़ शाळेच्या बोर्डावर विजयसिंह ठाकूर यांच्या कलाकृतीतून साकारलेले विद्यार्थ्यांचे स्वागत करणारे पेंटींग, प्रतिभा निकेतन प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षिका यांनी काढलेल्या रांगोळी, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरच निरागस हास्य या सर्व बाबींनी प्रतिभा निकेतनचा परिसर फुलून गेला होता़प्राथमिक विभागाचे सोनवणे यांच्या सूत्रसंचालनानंतर व्यासपीठावर प्ऱ नि़ हायस्कूलचे मुख्याध्यापक आनंद गायकवाड, प्ऱनि़ प्राथमिक विभागाचे मु़अ़ आचमवाड, विजयसिंह ठाकूर, राजदत्त कदम, बंडू पांचाळ, प्रल्हाद कांबळे, सौ़पूरकर, सौ़औसेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले़ केदारवडगावात अनोखे स्वागतगडगा : केदारवडगाव जि.प. प्रा.शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागताला सरपंच वसंतराव पा.वडगावकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तिरुपती दत्ता जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष काशीनाथ जाधव, मुख्याध्यापक एस.जी. शिंदे यांची उपस्थिती होती. त्यानंतर प्रभातफेरी काढण्यात आली. लक्षवेधी नमस्कारानंतर पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. गोड शिरा देवून विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यात आले. वरवटमनाठा : जि.प.प्रा. शाळा वरवट केंद्र मनाठा येथे प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली.याशिवाय इतर उपक्रमही घेण्यात आले. यासाठी मुख्याध्यापक के.एम. जोशी, सतीश वाकोडे, सविता जाधव, बालाजी लोमटे, मधुकर गोपनर, बापूराव जाधव, ऋषीकेश जयस्वाल यांनी प्रयत्न केले. शिक्षणविस्तार अधिकारी ए.टी. कापसे, केंद्रप्रमुख जी.एस. सोळंके यांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या. शा.व्य. समिती अध्यक्ष पी.टी. कूंभकर्ण, उपसरपंच विश्ननाथ सूर्यवंशी, बाबाराव सोनाळे, शिवाजी गाडेकर, दशरथ कदम, गणपत नरवाडे आदीही कार्यक्रमाला उपस्थित होते. देगलूर तालुक्यात शैक्षणिक पेरणी उत्साहातदेगलूर : दरवर्षी जून महिना आला की शेती सोबतच शाळांच्या कामांना वेग येतो़ शेतात पेरणी करणारा शेतकरी तर शैक्षणिक पेरणी करणारे शाळकरी १६ जून रोजी देगलूर तालुक्यात शैक्षणिक पेरणी उत्साहात, नव्या पुस्तकांच्या व पूष्पगुच्छांच्या सुगंधाच्या दरवळात झाल्याचे एकंदरीत दिसून आले़२१९ शाळा असलेल्या देगलूर तालुक्यात १४० जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत़ शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वाटप बहुतांश शाळांत करण्यात आले़ तसेच नवागतांचे स्वागत पूष्पगुच्छ देवून मंगलमय वातावरणात शाळारंभ करण्यात आला़ ग्रामीण भागातील शाळांची सकाळी शैक्षणिक जागृती करण्यासाठी ग्रामफेरीही काढण्यात आली़ ६ ते १४ वर्षे वयोगटातील एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही, याची आम्ही दक्षता घेत आहोत असे गटशिक्षणाधिकारी बालाजीराव सक्कीनवार यांनी सांगितले़दरम्यान, शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी १३ जून रोजी मुख्याध्यापकांची बैठक घेवून सूचना दिल्या होत्या़ लक्षवेधी नमस्कार, पाठ्यपुस्तके वाटप, परिसर स्वच्छता, पटनोंदणी आदी बाबींची तपासणी करण्यासाठी नांदेड येथून पथक देगलूर तालुक्यात आले होते़ पथक प्रमुख ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, नांदेडचे एम़आऱ राठोड, तसेच गटशिक्षणाधिकारी सक्कीनवार, केंद्रप्रमुख गजानन होनराव आदींनी वन्नाळी, वझरगा, जि़प़ हायस्कूल खानापूर येथील शाळांना भेटी दिल्या़ एकूणच शाळेचा पहिला दिवस लगबगीचा, कोवळ्या बालकांनी फुललेली शाळा ही बगीचा असाच जाणवला़८५ हजार पुस्तके वाटपमुदखेड : तालुक्यात शाळेच्या पहिल्या दिवशी तब्बल ८५ हजार पुस्तक विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली. गटशिक्षणाधिकारी ए.डी. आजेगावकर यांनी सकाळी मुगट जि. प. हायस्कूल येथे हजेरी लावून विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन समिती पदाधिकऱ्यांकडून पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यानंतर पुस्तक वाटपाला सुरुवात झाली.मुख्याध्यापक हनुमंत हामंद, समितीचे अध्यक्ष राजू हटकर, उपसरपंच आनंद कल्याणे, भीमराव पाटील, प्रल्हाद हाटकर, आशा हाटकर, शिक्षीका यशोदा संत, माधुरी तेलंग आदींनी पुष्प व पुस्तके वाटप केली. माळकौठा हायसकूल येथे मुख्याध्यापक ए. जे. कांबळे, समितीचे आनंद शिंदे, एकनाथ शिंदे, डी. बी. खानसोळे, राजश्री घोरबांड यांनी पुष्प व पुस्तके वाटप केली. रोही पिंपळगाव येथे मुख्याध्यापक आर.डी. धुदमल, आर. जी. इंदूरकर, कमल प्रधान, गोविंद माने, समिती अध्यक्ष आनंद शिंदे यांनी पुष्प व पुस्तके वाटप केली. विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठीची रक्कम शाळेच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती आनंद पाटील, आडाणे, कंधारकर यांनी शिक्षण विभागातून दिली. विविध आजारांविषयी आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश पवार यांनी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)पळसा येथे मोफत पाठ्यपुस्तके वाटपपळसा : येथील चक्रवर्ती अशोक विद्यालयात शालेय कामकाजाच्या पहिल्या दिवशी विद्याथञर्यांचे पुषेगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी मोफत पाठ्यपुस्तकांचेही वाटप करण्यात आले. या चकार्यक्रमाचे औचित्य साधून केंद्रप्रमुख गोविंद बागल यांनी विद्यार्थ्यांना लक्षवेधी नमस्काराचे महत्व पटवून सांगितले व शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती अडगावकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी बंडेरावसर, शंकर मुळे, श्रीमती अरुणा गंगमवार, मुंजाजी काकडे उपस्थित होते. सूत्रसंचालन विकास जावरकर तर राम तुपेकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)कंधारात शाळा मुलांनी गजबजलीकंधार : दीड महिन्यांच्या सुटीनंतर शाळेत मुला-मुलींनी हजेरी लावली. मुलांनी सुटीचा आनंद उत्साहाने प्रवासात, मामाच्या गावात,पर्यटनात घालविला. सोमवारी मात्र नव्याने उमेदीने, नवे स्वप्न उराशी बाळगत शाळे प्रवेश केला. मुलांमुळे जि.प. व खाजगी शिक्षण संस्थेच्या शाळा गजबजून गेल्याचे चित्र होते.शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी उत्साहवर्धक असतो. पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मात्र काही दिवस कसोटीचा काळ असतो. परंतु पूर्वी रमलेल्या, विविध कलागुणात, गुणवत्तेत, खोड्यात तरबेज आदीत निपूण असणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र शाळेची वेगळीच ओढ असते. सुटीत प्रवास, पर्यटनाचा आनंद आपल्या वर्ग मित्रासोबत पहिल्या दिवशी एकमेकाशी सांगितला जातो. तसा सोमवारी सांगण्यात मग्न झाल्याचे चित्र होते. नवे दप्तर, नवीन वह्या, नवीन पुस्तके, नवा कार्यक्रम, परिसर स्वच्छता, वर्ग स्वच्छता यात मुलांना वेगळाच आनंद वाटला. पहिल्या दिवशी स्वागत कार्यक्रम झाला. चेहऱ्यावरुन आनंद ओसंडून वाहतानाचे चित्र शहरासह ग्रामीण भागात दिसून येत होते.वरिष्ठ महाविद्यालयाचाही सुटीनंतरचा पहिला दिवस. श्री शिवाजी महाविद्यायात संस्थापक संचालक भाई डॉ. केशवराव धोंडगे यांनी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सदिच्छा संदेश दिला. प्राचार्य डॉ. जी. आर. पगडे यांनी २०१४-१५ शैक्षणिक वर्षातील विविध समितीचे गठण केले. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध बाबीवर भर दिला. प्रा. डॉ. एकनाथ पवार, प्रा. शिवराज चिवडे, माधवराव पेठकर, प्रा. डॉ. जगनमोहन रेड्डी, डॉ. श्रीधर खामकर, एच. एन. इंगळे, प्रा. चित्राताई लुंगारे, प्रा. लिलाताई आंबटवाड आदी उपस्थित होते. (वार्ताहर)