जालना : एका चौदा वर्षीय मुलाचे खुनाच्या उद्देशाने अपहरण केल्याच्या संशयावरून सदर बाजार पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संदर्भात कबाडी मोहल्ला भागात राहणाºया शेख अमीर अब्दुल सत्तार (१४) याने नातेवाइकांसोबत येऊन फिर्याद दिली आहे. रविवारी सायंकाळी चंदनझिºयाकडे जाण्यासाठी आपण सिंधीबाजार परिसरात आला होतो. मात्र, तासाभरानंतर आपण एका खोलीत बंद होतो. जाग आल्यानंतर लांब केस, सडपातळ बांधा, गळ्यात माळा असलेल्या व्यक्तीने आपल्या तोंडाळा काळे लावले. तेव्हा एक जण तिथे आला. त्याने माझे हात सोडून पळून जाण्यास सांगितले. काही वेळ पळाल्यानंतर रामतीर्थ पूल दिसला. तेथून घरी आल्यानंतर सर्व प्रकार नातेवाइकांना सांगितला, असे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
खुनाच्या उद्देशाने मुलाचे अपहरण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:53 IST