परंडा : तालुक्यातील लोहारा येथील अविनाश माहिजडे यांचा १३ महिन्यांचा मुलगा श्लोक हा शुक्रवारी घरासमोर खेळत असताना पाण्याच्या हौदात पडल्याने बुडाला़ त्याला कुर्डूवाडी येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ याबाबत परंडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ तपास पोहेकॉ काझी हे करीत आहेत़
हौदात पडल्याने बालकाचा मृत्यू
By admin | Updated: February 25, 2017 00:36 IST