शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वाटणीवरुन मुलाने पित्याची केली हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहही जाळला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 20:06 IST

वडील शेतीची वाटणी करीत नसल्याने पोटच्या मुलानेच त्यांचा लोखंडी चिमट्याने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पीरबावडा शुक्रवारी मध्यरात्री घडली.

फुलंब्री (औरंगाबाद ) : वडील शेतीची वाटणी करीत नसल्याने पोटच्या मुलानेच त्यांचा लोखंडी चिमट्याने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पीरबावडा शुक्रवारी मध्यरात्री घडली. एवढेच नव्हे तर पुरावा नष्ट करण्यासाठी या नराधम मुलाने पित्याचा मृतदेह प-हाट्यावर फेकून पेटवून दिला. 

शनिवारी सकाळी हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आल्यावर वडोदबाजार पोलिसांनी आरोपी मुलगा सतीश नारायण गाडेकर (३०) यास अटक केली. नारायण लक्ष्मण गाडेकर (५४, रा. पीरबावडा) असे मयताचे नाव आहे. फुलंब्रीपासून १५ कि.मी. अंतरावर राजूर रस्त्यावर पीरबावडा हे छोटेसे गाव असून तेथे नारायण लक्ष्मण गाडेकर हे दोन मुले, तीन मुली, पत्नीसह राहतात. नारायण गाडेकर यांना आठ एकर शेती असून त्यांनी या शेतीच्या बळावर दोन मुली व एक मुलाचे लग्न केले. एक मुलगा व एका मुलीचे लग्न होणे बाकी आहे. मोठा मुलगा सतीश याचे तीन वर्षापूर्वीच लग्न झाले असून त्याला पत्नी व दोन मुली आहेत. मला शेतीची वाटणी करून द्या, असा हट्ट तो वडिलांकडे करीत होता. या कारणावरून नेहमीच त्यांची भांडणे होत होती. यातूनच त्याने पित्याचा काटा काढण्याचे ठरविले.

असा केला खूननारायण गाडेकर हे शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत गावातील गोंधळाच्या कार्यक्रमात होते. यानंतर ते आपल्या शेतात झोपण्यासाठी गेले. हे सतीशला कळताच तो मध्यरात्री दोन वाजता शेतात गेला व झोपलेल्या वडिलांवर काठीने वार केले, पण त्याने काही फायदा झाला नाही. नंतर त्याने कपाशीची झाडे उपटण्याच्या लोखंडी चिमट्याने वडिलांवर सपासप वार केले. यात वडीलांनी जागीच प्राण सोडला. नराधम सतीशने पित्याचा मृतदेह खांद्यावर नेऊन सुमारे दोनचे फूट अंतरावर असलेल्या पºहाट्याच्या फासावर फेकला व आग लावून दिली.

आता पुरावाही नष्ट झाला म्हणून तो घरी गेला. शनिवारी सकाळी स्नान करुन तो परत शेतात गेला असता त्याला मृतदेह अर्धवट जळालेला दिसला. पुन्हा पेटवून देण्यासाठी लाकडे जमा करू लागला. तेव्हा शेजारील मुलाने त्याला हटकले तेव्हा या घटनेची बोंब संपूर्ण गावात झाली. मीच बापाला मारले असे सांगून तो मारसावळी शिवारातील सावळेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेला. तोपर्यंत ग्रामस्थांनी वडोदबाजार पोलिसांना बोलावून घेतले. दर्शन घेत असतानाच पोलिसांनी सतीशला ताब्यात घेतले. त्याने लगेच गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. 

घटनास्थळीच शवविच्छेदन नारायण गाडेकर यांचा मृतदेह ६० टक्के जळाला होता. त्यामुळे वडोदबाजार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश सावंत यांनी जागेवरच शवविच्छेदन केले.

आईचा आक्रोश आपण जन्म दिलेल्या मुलानेच आपले कुंकू पुसल्याने आईचा आक्रोश पाहून उपस्थित व पोलीसही गहीवरले. वडोदबाजार पोलिसांनी सतीशला बेड्या ठोकून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील करीत आहेत.