शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

सतर्क पित्यामुळे टळले बालिकेचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:46 IST

अडीच वर्षीय चिमुकलीच्या कानातील सोन्याच्या बाळ्या पाहून एका महिलेने तिला केळीचे आमिष दाखविले अन् चक्क घराजवळूनच तिला पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पिता आणि परिसरातील महिलांच्या तावडीत ती महिला सापडल्याने तिला पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अडीच वर्षीय चिमुकलीच्या कानातील सोन्याच्या बाळ्या पाहून एका महिलेने तिला केळीचे आमिष दाखविले अन् चक्क घराजवळूनच तिला पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पिता आणि परिसरातील महिलांच्या तावडीत ती महिला सापडल्याने तिला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. ही खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी १२.३० ते १ वाजेच्या सुमारास धूत हॉस्पिटलसमोरील म्हाडा कॉलनीत घडली.सुनीता दीपक लोंढे (४०, रा. रामनगर, मुकुंदवाडी), असे अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, म्हाडा कॉलनीतील रहिवासी नीलेश तेजराव हुसे (३४, मूळ रा. देशगव्हाण, ता. अंबड, जि. जालना) यांची अडीच वर्षांची मुलगी घराजवळ गल्लीत खेळत होती. तिच्या कानात सोन्याच्या काड्या (बाळ्या) होत्या. तेथून जाणाºया सुनीताची नजर सोन्याच्या बाळ्यांवर पडली. तिने झटकन चिमुकलीला केळीचे आमिष दाखविले अन् तिला उचलून सोबत घेऊन ती निघालीसुद्धा. घरापासून अंदाजे शंभर मीटर अंतरापर्यंत ती गेली असताना अचानक तिचे वडील नीलेश घराबाहेर आले. एक महिला मुलीस घेऊन जात असल्याचे दिसल्याने ते पळतच गेले आणि त्या महिलेस आडवे झाले. त्यांनी प्रथम मुलीस तिच्या हातातून हिसकावून घेतले. तेव्हा सुनीताने नीलेश यांनाच शिवीगाळ करीत, ‘येथून जाऊ द्या, नाही तर तुम्हाला छेड काढण्याच्या आणि बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवीन’, अशी धमकी ती देऊ लागली. नीलेश यांनी तात्काळ गल्लीतील महिलांना आवाज देऊन बोलावले. महिला जमा झाल्या आणि त्यांनी सुनीताला पकडले. पोलिसांना ही माहिती कळविण्यात आली. फौजदार विजय जाधव यांचे पथक व एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक श्रीपाद परोपकारी, कर्मचाºयांनी धाव घेऊन आरोपी महिलेस ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. पोलिसांनी तिची सखोल चौकशी केली. पो.नि. परोपकारी म्हणाले की, चिमुकलीच्या कानातील सोन्याच्या काड्या चोरण्यासाठीच तिने अपहरणाचा प्रयत्न केला होता. हुसे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू होती.