औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ११ जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ८.४० वा. वाजता ते नागपूर येथून विमानाने औरंगाबादकडे प्रयाण करतील. ९.२५ वाजता चिकलठाणा विमानतळावर आगमन होईल. ९.३० वाजता हेलिकॉप्टरने पैठणकडे प्रयाण करतील. ९.५० वाजता कै. दिगंबरराव कावसानकर स्टेडियम हेलिपॅड, तालुका क्रीडा संकुल, पैठण येथे आगमन. ९.५५ वाजता कै. दिगंबरराव कावसानकर स्टेडियम हेलिपॅड येथून मोटारीने श्रीनाथ हायस्कूल, पैठणकडे ते प्रयाण करतील. १० वाजता श्रीनाथ हायस्कूल येथे पोहोचतील. हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला ते उपस्थित राहतील. ११ वाजता श्रीनाथ हायस्कूल येथून मोटारीने पैठण हेलिपॅडकडे प्रयाण करतील. ११.०५ वाजता पैठण हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने जवखेडा (ता. भोकरदन, जि. जालना) या गावाकडे ते प्रयाण करतील. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त ग्रामीण पोलिसांनी पैठण शहरात कडेकोट पोलीस बंदोस्त तैनात केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्ह्यात
By admin | Updated: January 11, 2016 00:08 IST