शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्य हे चुलीवरल्या कढईतील कांदेपोहे; छत्रपती संभाजीनगरकर महिन्यात खातात १०० टन पोहे

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 8, 2024 13:01 IST

नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होताच कच्च्या कांदेपोह्यांची विक्री २० टक्क्यांनी वाढली.

छत्रपती संभाजीनगर : ‘भिजलेल्या क्षणांना आठवणीची फोडणी...आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे’ हे ‘सनई चाैघडे’ या चित्रपटातील गाणे लोकप्रिय ठरले होते...कांदेपोहे म्हटले की, स्थळ पाहण्यासाठी आलेला मुलगा व त्याच्या आई-वडिलांसाठी मुलगी ‘कांदेपोहे’ घेऊन येते. हा पारंपरिक प्रसंग नेहमीचाच. पण एरव्हीही नाश्त्याचा तो एक लोकप्रिय पदार्थ आहे. शहरात महिन्याकाठी १५० टन कच्चे पोहे विकले जातात. त्यात सर्वाधिक १०० टन एवढा हिस्सा कांदापोह्यांचा असतो.

२० टक्क्यांनी वाढली पोह्यांची विक्रीनवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होताच कच्च्या कांदेपोह्यांची विक्री २० टक्क्यांनी वाढली. कारण, विद्यार्थ्यांना डब्यात कांदा पोहे दिले जातात. महाविद्यालय, क्लासेस, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सकाळचा नाश्ता गरमागरम कांदेपोहे ठरलेला असतो. यामुळे जूनमध्ये २० टक्क्यांनी पोह्यांचे विक्री वाढते.

कच्च्या पोह्यांचे प्रकार व किंमतपोह्यांचे प्रकार किंमत (प्रति किलो)कांदा पोहा --- ६० रु. पातळ पोहा--- ७० रु. मध्यम पोहा---५५ रु. टिकली पोहा---६० रु. भाजका पोहा---७० रु. शिक्का पोहा--- ७० रु. दगडी पोहा--- ४५ रु. ------

शहरात कुठून येतात कच्चे पोहे? गुजरात येथील नवसारी, मध्य प्रदेशातील इंदोर, उज्जेैन, बालाघाट व छत्तीसगड येथील राजनंदगाव, बाटापारा अशा तीन राज्यांतून कच्च्या पोह्यांची आवक होते.

टिकली, शिक्का पोहाटिकली पोहा, शिक्का पोहा असाही पोहा असू शकतो याची अनेकांना माहिती नाही. पण, हे प्रकार तळण्याचे आहेत. शहरात कांदा पोहा, भाजका पोहा, मध्यम व पातळ पोहा जास्त विकतात.

भेळभत्त्यासाठी भाजका पोहाखास ‘भेळभत्ता’ खाण्यासाठी ग्राहक ग्रामीण भागात किंवा आठवडी बाजारात येत असतात. यासाठी भाजका पोहा वापरला जातो. या पोह्याला तळण्याची गरज नाही. नुसती फोडणी दिली की झाले.

दर महिन्याला किती टन पोहे खातात शहरवासीय ? शहरात होलसेल विक्रेत्यांकडे १५ ते १६ ट्रक भरून कच्चेपोहे आणले जातात. महिन्याभरात सर्व प्रकारचे १५० टन पोहे विकले जातात. त्यातील १०० टन कांदा पोहे विकले जातात. होलसेलमध्ये ५० ते ६० लाखांची उलाढाल होते. किरकोळ विक्रेते या पोह्यांना खमंग फोडणी देऊन विकतात, घरोघरी नाश्त्याला पोहे बनतात.- उमेश लड्डा, पोह्यांचे व्यापारी

टॅग्स :foodअन्नAurangabadऔरंगाबादMarketबाजार