शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरला मिळणार अखंड वीज; जिल्हाभरात ६३ उपकेंद्र, ३ हजार ८०० कोटींची योजना

By विकास राऊत | Updated: October 21, 2023 12:33 IST

छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात अखंड वीजपुरवठा करण्यासाठी ३ हजार ८०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात व शहरात अखंड वीजपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने ३ हजार ८०० कोटी रुपयांची योजना केंद्र शासनाने मंजूर केली आहे. योजनेतून ६३ ठिकाणी उपकेंद्रे बांधण्यात येणार असून त्यासाठी जागांचा शोध सुरू झाला आहे.

केंद्र सरकारच्या आर्थिक साहाय्यातून सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) राबविण्यात येत आहे. यासाठी राज्याला ३७ हजार कोटी मिळाले आहेत, तर छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात अखंड वीजपुरवठा करण्यासाठी ३ हजार ८०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या अनुषंगाने शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी बैठक घेतली. बैठकीला विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, मुख्य अभियंता डाॅ. मुरहरी केळे उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. कराड यांनी सांगितले, आरडीएसएस योजनेतून शहर, जिल्ह्यात वीज वितरणाच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे, पुरवठ्याच्या गुणवत्ता व उपलब्धतेत सुधारणा करणे, ग्रामीण भागात फीडर सेप्रेशन करणे, स्मार्ट मीटरिंग करून विजेचे होणारे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न असेल. जिल्ह्यात महावितरणला ६३ ठिकाणी जागांची गरज आहे. त्या विविध विभागांतर्गत असलेल्या सर्व जागांची सात दिवसांत एनओसी देण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या आहेत.

ग्रीन एनर्जी निर्मिती, जायकवाडीत पाहणीकेंद्र सरकारच्या सोलर सिटीची योजनेअंतर्गत छतावर (रुफ) सोलर करता येईल का, यावर बैठकीत चर्चा झाली. छतावर सोलर पॅनलद्वारे वीजनिर्मिती झाली तर संबंधितांचे ८० टक्के वीजबिल कमी होऊ शकते. शहरात एका झोनमध्ये पथदर्शी म्हणून रुफ सोलरद्वारे वीजनिर्मिती प्रकल्पासाठी मनपाला सूचना दिल्या आहेत. जायकवाडीत १५ एकरात फ्लोटिंग सोलर प्रोजेक्ट पाहणीसाठी पर्यावरण विभाग, वन विभागाकडून एनओसी मिळाली आहे. इथे तयार होणारी वीज खरेदी करण्यासंदर्भात या महिन्याच्या अखेरीस करार होणार असल्याचेही डॉ. कराड म्हणाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीज