शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याचे आर्थिक इंजिन सुसाट! छ. संभाजीनगरच्या उद्योजकांनी भरला ४, ९६७ कोटींचा GST

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 17:45 IST

बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनाचा 'पॉझिटिव्ह' इम्पॅक्ट; संभाजीनगर, जालना आणि नांदेड मिळून ७,११६ कोटींची वसुली

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात बहुराष्ट्रीय-राष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनामुळे दुसऱ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने आणखी एक विक्रम केला. गत आर्थिक वर्षात येथील उद्योजक, व्यावसायिकांनी ४ हजार ९६७ कोटी ५५ लाख रुपयांचा राज्य जीएसटी भरला आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत उद्दिष्टापेक्षा ७.५२ टक्के अधिकची भर पडली आहे.

राज्य जीएसटी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात ४ हजार ६२० कोटी १५ लाख रुपयांची जीएसटी वसूल करण्यात आली होती. २०२५-२६ या गत आर्थिक वर्षात जीएसटी वसुली तब्बल ३४७ कोटी ४१ लाख रुपयांनी वाढून ४ हजार ९६७ कोटी ५५ लाखांपर्यंत जाऊन पोहोचली. एकूण जीएसटी वसुलीत ७.५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, बाजूच्या जालना जिल्ह्यात मात्र, ०.२३ टक्क्यांनी वसुलीत घट झाली. जिथे दोन वर्षांपूर्वी १०७४ कोटी २३ लाख रुपयांचा जीएसटी जालनातील उद्योग, व्यावसायिकांनी भरला होता तिथे गतवर्षी १०७१ कोटी ७७ लाख रुपये एवढाच जीएसटी भरला. म्हणजे २ कोटी ४५ लाख रुपयांनी येथे वसुली कमी झाल्याचे दिसून आले. त्या तुलनेत नांदेड विभागाने चांगली कामगिरी केली. २०२४-२५ पेक्षा मागील २०२५-२६ या वर्षात ११६ कोटी ७२ लाख रुपये जास्त वसुली करून १०७६ कोटी ८० लाख रुपयांचा जीएसटी भरला. यामुळे राज्यसरकारच्या तिजोरीत १२.१६ टक्क्यांनी वाढ झाली.

संभाजीनगर, जालना, नांदेड मिळून जीएसटी वसुलीत ६.९४ टक्के वाढछत्रपती संभाजीनगर, जालना व नांदेड विभागातील जीएसटी वसुलीची एकूण आकडेवारी पाहिली तर ६.९४ टक्के वाढ झाली. या विभागात एकूण ८८ हजार ४९५ करदाते आहेत. त्यांनी ४६१ कोटी ६८ लाख रुपयांची अधिकची भर घालत गत आर्थिक वर्षात ७११६ कोटी १३ लाख जीएसटीत जमा केले. राज्य जीएसटी विभागाच्या सांघिक कामगिरीमुळे जालना विभागाचे अपयश लपले गेले.

पुढील वर्षी जीएसटी वसुलीत आणखी वाढछत्रपती संभाजीनगरात राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आगमन होत आहे. त्यांचे उत्पादन सुरू झाल्यावर जीएसटी वसुलीत आणखी वाढ होईल. यासोबत व्यावसायिकांची संख्या वाढत आहे. त्यांच्या व्यवसायांचाही विस्तार होत आहे. यामुळे येत्या वर्षात याचा सकारात्मक परिणाम जीएसटी वसुलीत बघण्यास मिळेल.-अभिजित राऊत, अपर आयुक्त, राज्य जीएसटी छत्रपती संभाजीनगर

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada's economic engine roars; Chhatrapati Sambhajinagar fills ₹4,967 crore GST.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar's GST collection surged to ₹4,967.55 crore, exceeding targets by 7.52%. While Jalna saw a slight dip, Nanded excelled with a 12.16% increase. Overall, Sambhajinagar, Jalna, and Nanded divisions witnessed a 6.94% rise in GST, driven by new industries and business growth.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरGSTजीएसटी