शहरं
Join us  
Trending Stories
1
"चूक मान्य करुन माफी मागा"; महात्मा फुलेंबाबत केलेल्या विधानावरुन सदावर्तेंचे उदयनराजेंना प्रत्युत्तर
2
"डोक्याने क्रॅक आहेस का, मी मगासपासून..."; 'त्या' प्रश्नाने संयम सुटताच अजितदादांची तुफान फटकेबाजी
3
आईच्या बॉयफ्रेंडचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जन्मदातीने पोटच्या पोरीचे व्हिडीओ केले व्हायरल
4
DC vs MI : तिलक वर्मानं ती गोष्ट लयच मनावर घेतलीये; सलग दुसऱ्या फिफ्टीनंतर सेलिब्रेशनमध्ये तेच दिसलं!
5
'वक्फ कायद्याच्या नावाखाली लोकांना भडकवले जातेय, हिंदूंना घराबाहेर...'; मुर्शिदाबाद हिंसाचारावरून CM योगींचा हल्लाबोल
6
IPL 2025 DC vs MI : रोहित शर्माचा आणखी एक डाव ठरला फुसका: नवख्या पोरानं दिला चकवा!
7
विदर्भाच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसायचा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
8
धक्कादायक! रेशन कार्ड बनवण्यासाठी गेली, वाटेतच होणाऱ्या पतीसमोर सामूहिक अत्याचार
9
RCB चा विजयी 'चौकार'! IPL ट्रॉफी विजेत्यांना घरात मात देण्याचा सेट केलाय खास पॅटर्न
10
शिक्षण घोटाळ्यात आणखी तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक; घोटाळ्याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत
11
"मृत्युदंड हा इस्लामचा भाग..."; ४ जणांना गोळ्या घालून मारल्यानंतर, काय म्हणाला तालिबान नेता?
12
₹8 वरून ₹81 वर पोहचला हा शेअर, 1 लाखाचे केले ₹10.20 लाख; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
“मित्रांकडून पैसे उधार घेतले, कष्टाने पहिलं घर...”; ‘ते’ दिवस आठवून अभिनेता झाला भावुक
14
शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार! त्यांच्यासह बहिणीवर कारवाई होणार, अटक वॉरंट जारी
15
Akash Anand : “मला पुन्हा पक्षात काम करण्याची संधी द्या...“; आकाश आनंद यांनी मागितली मायावतींची माफी
16
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत बौद्ध धम्माची दीक्षा घेणाऱ्या हरिदास टेंभूर्णे यांचे निधन
17
Virat Kohli Record : किंग कोहलीचा मोठा पराक्रम; अर्धशतकांच्या 'शंभरी'सह रचला नवा विक्रम
18
टोलमध्ये सर्वसामान्यांना दिलासा! ३ हजार रुपयांचा पास मिळणार; FASTag बाबतही अटी असणार
19
“काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं” शरद पवारांसोबत भेटीनंतर आज बारामतीत अजित पवार म्हणाले…
20
कधी काळी अफगाणिस्तानात लाखोंच्या संख्येने हिंदू राहत होते, तालिबानी सरकार आल्यानंतर किती उरले? जाणून धक्का बसेल

अंबादास कागदोपत्री नेता, खैरेंनी आता नातवंडे सांभाळावी; संदीपान भुमरेंची उद्धवसेनेच्या नेत्यांवर निशाणा

By बापू सोळुंके | Updated: April 13, 2025 22:02 IST

खैरे आणि अंबादास यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याचे गरज नाही - संदिपान भुमरे

छत्रपती संभाजीनगर: उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांना कोणी विचारत नाही, यामुळे त्यांनी आता नातवंडे सांभाळावी, तर अंबादास दानवे हे कागदोपत्री नेता आहे, या दोघांनी जिल्ह्याची वाट लावली, अशा शब्दात छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी त्यांच्यावर रविवारी निशाणा साधला.

मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या भुमरे यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, चंद्रकांत खैरे यांना का महत्व द्यायचे. हे स्वत: म्हणतात, मला कोणी विचारत नाही, माझं कोणी एकेत नाही. जनतेने त्यांना फार डोक्यावर घेतले होते. आता त्यांना कोणी विचारत नाही, हे खरे आहे. त्यांनी आता घरी बसून नातवंडे सांभाळावी. अंबादासने स्वत: केलेले काम दाखवावे असे नमूद करीत अंबादासचे प्रॅक्टीकल काहीच काम नाही. ते फक्त कागदोपत्री नेता असल्याची टीका खा. भुमरे यांनी केली. ते म्हणाले की, जिल्ह्याची लोकसभा गेली, सगळी विधानसभा गेली आता मनपा आणि जिल्हा परिषदही जाईल. उद्धवसेनेकडे काहीच राहणार नाही. या दोन्ही नेत्यांनी जिल्ह्याची वाट लावल्याचे भुमरे यांनी सांगितले. खैरे आणि अंबादास यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याचे गरज नाही. हे दोघेच भांडू लागली आहेत. यामुळे येथे हे दोघेच राहणार आहेत. वरीही ते दोघेच (उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे )बापलेक पक्षात राहणार असल्याचे भुमरे म्हणाले. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत पक्षप्रवेशासाठी रोज गर्दी होत आहे. उद्धवसेनेकडे माणसेच राहिले नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

भुमरे यांनी एमएलडी पाणी किती सांगावे; अंबादास दानवे यांचे खा.भुमरे यांना उत्तर

मला कागदीनेता म्हणणाऱ्या खासदार संदीपान भुमरे यांनीध एमएलडी पाणी किती असते हे सांगावे, मेरी संस्थेचा पाण्यासंबंधी मराठवाडा विरोधी अहवाल त्यांनी वाचला का? असा सवाल करीत त्यांना केवळ गुत्तेदारी करणे एवढेच माहिती आहे, असे खोचक प्रत्यूत्तर विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी दिले.

तापडिया नाट्य मंदीर येथे पत्रकारांनी भुमरे यांनी केलेल्या टीकेकडे आ.दानवे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, मी शहराच्या पाणी प्रश्नांवर सरकारविरोधात संघटन उभे करीत आहे. शहराचा पाणी प्रश्न कागदावर आहे का, असा सवाल त्यांनी केला. लोकसभा, विधानसभा निवडणूकीत उद्धवसेनेच्या पराभव झाल्याची टीका भुमरे यांनी केली होती. याकडे लक्ष वेधले असता आ.दानवे म्हणाले की, मागील निवडणुकांमध्ये सत्तेचा दुरुपयोग करुन आणि भ्रष्टाचाराचा पैसा वापर केल्याने आम्हाला सत्ता मिळाली नाही, असे नमूद केले.

टॅग्स :Sandeepan Bhoomraसंदीपान भुमरेAmbadas Danweyअंबादास दानवेChandrakant Khaireचंद्रकांत खैरेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर