शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांचे गठ्ठे, तर सत्ताधाऱ्यांचे खोके! नामांतर आक्षेप, समर्थनांच्या छाननीला लागणार १५ दिवस

By विकास राऊत | Updated: March 29, 2023 14:44 IST

आलेल्या आक्षेपांची छाननी होईल. त्यातून शहराला इतर नाव सुचविलेले व इतर आक्षेपार्ह आक्षेप वगळण्यात येतील.

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या नामांतराची वैधानिक लढाई जिंकण्यासाठी समर्थक आणि विरोधकांनी २७ मार्चला सायंकाळपर्यंत आक्षेप आणि सूचना विभागीय आयुक्तालयात दाखल केल्या. समर्थन आणि आक्षेपांची अर्जांची एकूण संख्या ७ लाख ४ हजार ६५६ आहे. याची छाननी पूर्ण होण्यासाठी सुमारे १५ दिवस लागतील. रोज १० ते १५ हजार अर्जांची छाननी होत असून, त्यात आक्षेप व समर्थनकर्त्यांची माहिती संकलित केली जात आहे. आयुक्तालयात ५०वर कर्मचारी डेटा एंट्री करण्यासाठी तैनात आहेत.

औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याची अधिसूचना केंद्राने काढली होती. त्यानंतर राज्य शासनाने दोन्ही शहरांच्या नामांतराबाबत २७ मार्चपर्यंत आक्षेप, हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. आलेल्या आक्षेपांची छाननी होईल. त्यातून शहराला इतर नाव सुचविलेले व इतर आक्षेपार्ह आक्षेप वगळण्यात येतील. त्यानंतर प्रत्येक आक्षेपाची नोंद घेण्यात येईल. त्यानंतर ती माहिती राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल. मंगळवारी दिवसभरात अनेक शिष्टमंडळांनी समर्थनार्थ आलेल्या अर्जांच्या आकड्यांवरून शंका व्यक्त करणारे निवेदन विभागीय प्रशासनाला दिले.

समर्थन अर्जांची चौकशी कराशाहीन क्लब ऑफ औरंगाबादच्या शिष्टमंडळाने दुपारी उपायुक्त पराग सोमण यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, शहराचे नाव छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ आलेले अर्ज अर्धवट असल्याचे दिसते. त्यात रहिवासी पुरावा, ओळखीचा पुरावा जोडलेला नाही. या अर्जांची चौकशी करून ते रद्द करण्याची मागणी शेख जोहरी, अब्दुल सिद्दीकी, ताहीर मीर कादरी यांनी केली. उपायुक्त सोमण यांनी शिष्टमंडळाचे निवेदन विभागीय आयुक्तांसमोर ठेवण्यात येईल, असे सांगितले.

पूर्ण महिना गेला आकडेमोड करण्यातआयुक्तालयातील आवक-जावक विभागातील कर्मचाऱ्यांचा २७ फेब्रुवारी ते २७ मार्च हा पूर्ण महिना आक्षेप व समर्थन अर्जांची आकडेमोड करण्यात गेला. समर्थन, आक्षेपांची दैनंदिन नोंद, छाननी, गठ्ठे बांधणे, प्रत्येक अर्जाची प्रत डेटा एंट्रीसाठी संबंधितांकडे पाठविण्याचे काम विभागातील कर्मचाऱ्यांनी केले. पुढील १५ दिवस अर्जांची छाननी करून डेटा एंट्री केली जाणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad District Health Officerऔरंगाबाद जिल्हा आरोग्य अधिकारी