लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : मंत्रालयात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून चौघाजणांकडून प्रत्येकी दोन लाख रूपये असे एकूण आठ लाख रूपये घेऊन फसवणूक केल्यामुळे कैलास दिवटे (रा.शिरनेर ता.अंबड) यांच्या फिर्यादीवरून सोमवारी अंबड पोलीस ठाण्यात सुदर्शन आगळे (रा.येवळी बु., ता. सिन्नर जि. नाशिक) याच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.आगळे याने ‘मंत्रालयात लिपिक पदाच्या जागा निघाल्या आहेत. मंत्रालयात आपली ओळख असल्याने तुम्हाला नोकरी लावून देतो’ असे आमिष दाखविले. जुनी ओळख असल्याने फिर्यादींनी २५ आॅगस्ट २०१५ रोजी आगळे याला प्रत्येकी दोन लाख असे एकूण ८ लाख रूपये जमा करून दिले. काही दिवसानंतर फिर्यादींनी नोकरीबाबत विचारणा सुरू केली. मात्र आगळेकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे समजताच दिवटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल बी. जी. खंडागळे करीत आहेत.
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:40 IST