लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दिल्ली विमानतळावरील युजर डेव्हलपमेंट शुल्कात (यूडीएफ)कपात करण्यात आली आहे. त्यामुळे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानसेवेने दिल्लीला ये-जा करणे स्वस्त होणार आहे.दिल्ली विमानतळावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांसाठी यूडीएफ आकारले जात होते; परंतु आता दिल्ली विमानतळावर दाखल होणाऱ्या विमानांवर यूडीएफ लागणार नाही. केवळ उड्डाण करणाऱ्या विमानांना यूडीएफ कपात केली जाणार आहे. दिल्ली विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या देशांतर्गत विमान प्रवाशांना आता फक्त १० रुपये यूडीएफ द्यावा लागणार आहे. यासाठी पूर्वी २७५ ते ५५० रुपये आकारले जात होते.
दिल्ली विमानसेवा होणार स्वस्त
By admin | Updated: July 9, 2017 00:42 IST