शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

पाठलाग करून आवळल्या दरोडेखोरांच्या मुसक्या

By admin | Updated: December 1, 2014 01:26 IST

पैठण : पैठण-पाचोड रोडवर घातक शस्त्रांसह पाच दरोडेखोर पैठणकडे आगेकूच करीत होते. रात्रीचे बारा वाजून गेलेले... सर्व रस्ता सामसूम झालेला... एव्हाना दरोडेखोरांनी रहाटगाव मागे टाकले.

पैठण : पैठण-पाचोड रोडवर घातक शस्त्रांसह पाच दरोडेखोर पैठणकडे आगेकूच करीत होते. रात्रीचे बारा वाजून गेलेले... सर्व रस्ता सामसूम झालेला... एव्हाना दरोडेखोरांनी रहाटगाव मागे टाकले. अंदाज घेत कधी शेतात लपत, कधी रोडवर येत दरोडेखोर आंतर कापत होते. तेवढ्यात परीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना या दरोडेखोरांबाबत पोलीस नेटवर्कद्वारे खबर मिळाली अन् त्यांनी गांभीर्य लक्षात घेऊन शिताफीने दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या.जाधव यांनी पैठण परिसरात पेट्रोलिंगवर असलेले स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग भारती यांना कल्पना दिली, शिवाय एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गिरी यांना तयारीनिशी निघण्याच्या सूचना दिल्या. स्वत:बरोबरच पोलीस उपनिरीक्षक रसूल तांबोळी, जमादार विजय बाम्हंदे, विष्णू पवार, गायकवाड, शिंदे यांच्यासह दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी निघाले. कुणी कोठून, कसे यायचे व प्रसंगी काय करायचे या सूचना जाधव मोबाईलद्वारे सर्व सहकाऱ्यांना देत होते. दरोडेखोरांकडे घातक शस्त्र असल्याने मोहिमेवरील पोलिसांनीही आपले शस्त्र सज्ज ठेवले होते.पाचोड रोडवर ठरल्याप्रमाणे आपापली जबाबदारी पार पाडत पोलिसांनी पाचोड रोड व त्याच्या चारही बाजूं वेढल्याचे तसेच पोलिसांचे वाहन समोरून येत असल्याचे दरोडेखोरांच्या लक्षात आले. पाचोडकडूनही येणारे वाहनही पोलिसांचेच आहे, हे सराईत दरोडेखोरांना कळून चुकले होते. दरोडेखोरांनी पोलिसांना चकवा देण्यासाठी मोटारसायकल रोडलगतच्या शेतात सोडली व ते लपून बसले. पोलिसांनीही पैठण ते रहाटगावपर्यंतचा टापू पिंजून काढला. मात्र, पोलिसांना दरोडेखोर सापडले नाहीत.खबर मात्र पक्की असल्याने मोहिमेवरून परतायचे नाही, असे आदेश जाधव यांनी फौजदार तांबोळी, भारती यांना दिले. पैठण परिसरात सहायक पोलीस निरीक्षक संजय सहाने यांनी सहकारी घेऊन चोख तटबंदी केलेली होती. आपसात सारखे संदेशवहन पोलिसांत सुरू होते; परंतु सुगावा लागत नव्हता. रात्रीचे दीड वाजून गेले होते. दरोडेखोर याच परिसरात दडून बसले आहेत, हे अण्णासाहेब जाधव यांनी हेरले होते. शेवटी तेथून निघून गेल्याचे नाटक करीत पोलीस अंधारात दबा धरून बसले. पोलीस निघून गेले, असा समज होऊन लपून बसलेले दरोडेखोर बाहेर आले व मोटारसायकल रोडवर घेण्यासाठी सरसावले. पोलिसांनी सावज रेंजमध्ये येऊ दिले व अचानक हल्लाबोल केला. पोलिसांना पाहून गडबडलेल्या दरोडेखोरांनी अंधारात पळ काढला. दरोडेखोर पुढे, पोलीस मागे असा कुडकुडत्या थंडीत पाठलाग सुरू झाला. दोन किलोमीटर पाठलाग करीत एक एक करीत पाचपैकी तीन दरोडेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे तालुक्यातील इतर गुन्हेगारांचेही धाबे दणाणले आहेत.