शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारी अधिकाऱ्यांची ‘पेट’नंतर उचलबांगडी

By admin | Updated: July 1, 2017 00:49 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ‘पेट-४’ परीक्षा होत आहे. ही परीक्षा होईपर्यंत प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील यांना काम करू द्यावे लागेल. त्यानंतर त्यांची उचलबांगडी करता येईल.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ‘पेट-४’ परीक्षा होत आहे. ही परीक्षा होईपर्यंत प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील यांना काम करू द्यावे लागेल. त्यानंतर त्यांची उचलबांगडी करता येईल. यासाठी किमान पंधरा दिवसांचा अवधी हवा आहे. तोपर्यंत उपोषण मागे घेण्याची विनंती चार दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेले डॉ. बाबासाहेब भालेराव यांची शुक्रवारी भेट घेऊन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केली. यानंतर डॉ. भालेराव यांनी कुलगुरूंनी स्पष्ट आश्वासन दिल्यामुळे उपोषण मागे घेतले आहे.विद्यापीठातील प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील यांची नेमणूक विद्यापीठ कायद्याचा भंग करणारी आहे. ही नियुक्ती रद्द करण्यासाठी चार दिवसांपासून डॉ. बाबासाहेब भालेराव यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. हे उपोषण मागे घेण्यासाठी गुरुवारी कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांनी पत्र देऊन डॉ. पाटील यांची नियुक्ती महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अ‍ॅक्ट-२०१६ नुसार केलेली नसल्याचे स्पष्ट केले. हा निर्णय कुलगुरूंनी आपल्या अधिकारात घेतल्याचे स्पष्ट केले. तरीही डॉ. भालेराव यांनी उपोषण सुरूच ठेवले.यावेळी एसएफआयच्या प्राजक्ता शेटे, सुनील राठोड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राहुल तायडे, अमोल दांडगे आणि एनएसयूआयचे नीलेश आंबेवाडीकर यांनी जोरदार घोषणाबाजी केली. डॉ. पाटील यांना हटविल्याशिवाय उपोषण तर सुटणार नाहीच. उलट सर्वपक्षीय विद्यार्थी संघटना आंदोलनात उतरणार असून, आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यावेळी डॉ. भालेराव यांनीही आक्रमक भूमिका घेऊन आपण मागणीवर ठाम असल्याचे म्हटले. यामुळे शेवटी कुलगुरूंनी पेट-४ परीक्षा होताच डॉ. सतीश पाटील यांची उचलबांगडी करणार असल्याची घोषणा करून डॉ. भालेराव यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. डॉ. पाटील यांची उचलबांगडी करण्याचे आश्वासन दिल्यामुळे डॉ. भालेराव यांनी अखेर उपोषण मागे घेतले.