लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : दक्षिण मध्य रेल्वेने १ नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक घोषित केले असून नांदेड विभागातून धावणाºया काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.नागपूर ते मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस नांदेड स्थानकावरून पूर्वीच्या वेळेपेक्षा पंधरा मिनिटे लवकर म्हणजे १६.४५ वाजता सुटेल. काचीगुडा ते नरखेड-अकोला इंटरसिटी एक्स्प्रेस पूर्णा येथून पूर्वीच्या वेळेपेक्षा लवकर म्हणजेच १४.२५ वाजता सुटेल.तिरुपती ते श्री साई नगर शिर्डी एक्स्प्रेस परतूर येथून ५.५५ वाजता सुटेल. संबलपूर ते नांदेड एक्स्प्रेस मुदखेड येथून १३.३७ वाजता सुटेल. विशाखापटनम - नांदेड रेल्वे मुदखेड येथून १३.३७ वाजता सुटेल. निझामाबाद ते पंढरपूर पॅसेंजर परभणी येथून १८.२० वाजता तर पोखर्णी येथून १९.०० वाजता सुटेल.हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस नगरसोल येथून पहाटे ३ वाजता सुटेल. यासह अन्य गाड्यांच्या वेळेत झालेल्या बदलाची नोंद घ्यावी.
रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:42 IST