शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर; संपर्क मोहिमेतून जिल्हाध्यक्ष दानवेंचा 'संपर्क' तोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 11:59 IST

Chandrakant Khaire vs Ambadas Danve News : शिवसेना नेते खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली चार विधानसभा मतदारसंघनिहाय वॉर्डाचा आढावा व पदाधिकारी बैठक अभियानात घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशिवसेना शहर शाखेतर्फे ५ ते ९ जुलै दरम्यान शिवजनसंपर्क अभियानाचे आयोजन केले आहे. दानवे आणि खैरेंच्या गटबाजीत या बैठकींना किती कार्यकर्ते आणि पदाधिकारी हजेरी लावतात, याकडे लक्ष

औरंगाबाद : शिवसेनेच्या जनसंपर्क मोहिमेत जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांना बाजूला ठेवत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी बैठकीचा अजेंडा रविवारी प्रसिद्धीस दिला आहे. दानवेंना डावलून खैरेंनी आढावा बैठकींचा कार्यक्रम हाती घेतल्यामुळे त्या दोघांमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. बैठकीला गेले नाहीतर खैरेंची नाराजी आणि गेले तर दानवेंचा रोष ओढवून घ्यावा लागणार असल्यामुळे यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गोची होण्याची शक्यता आहे. ( Shivsena's Chandrakant Khaire avoids District President Ambadas Danve from Jansampark campaign ) 

शिवसेना शहर शाखेतर्फे ५ ते ९ जुलै दरम्यान शिवजनसंपर्क अभियानाचे आयोजन केले आहे. शिवसेना नेते खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली चार विधानसभा मतदारसंघनिहाय वॉर्डाचा आढावा व पदाधिकारी बैठक अभियानात घेण्यात येणार आहे. यात सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, संतोष जेजूरकर, बंडू ओक, अनिल पोलकर, विनायक पांडे, आनंद तांदुळवाडीकर, बप्पा दळवी, शहरप्रमुख विजय वाघचौरे, बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, सुशील खेडकर, माजी सभागृह नेता विकास जैन, माजी गटनेते मकरंद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठका होणार आहेत. उपशहरप्रमुख, विभाग प्रमुख, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, उपविभागप्रमुख, शाखा प्रमुख आदींना बैठकीसाठी बोलविले आहे़. सदरील बैठकीत कोरोनाचे सर्व नियम तंतोतंत पाळले जातील, असा दावा करण्यात आला आहे.

कितीजण बैठकीला येणार याकडे लक्षमनपा निवडणुका अथवा संघटन बांधणी करण्याचा मुद्दा पुढे आला की, फुलंब्री मतदारसंघात बैठकींच्या सत्राची सुरुवात होते, परंतु इतर वेळी या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना कुठल्याच प्रक्रियेत घेतले जात नसल्याची ओरड वारंवार होते. दरम्यान, दानवे आणि खैरेंच्या गटबाजीत या बैठकींना किती कार्यकर्ते आणि पदाधिकारी हजेरी लावतात, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेChandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv Senaशिवसेना