जालना: भोकरदन तालुक्यातील पारध येथून मोटारसायकलवर सुंगधी चंदनाचे लाकडे घेऊन जाणाऱ्या दोघांनी पोलिसांना हुलकावणी देत चंदनाची लाकडी फेकून पलायन केल्याचा प्रकार १६ जुलै रोजी घडला. पोलिसांनी ती फेकून दिलेली चंदनाची लाकडे जप्त केली असून त्याची किमंत ३२ हजार रूपये असल्याचे सांगण्यात आले.भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार येथील आसिफखाँ नसीफ खा पठाण व आरेफ खा सांडूखा पठाण हे दोघे मोटारसायकलवर बसून कोठून तरी चोरून आणलेली चंदनाची लाकडे घेऊन जात होते. त्यांना पारध पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र त्या दोघानी पोलिसांना हुल देवून मोटारसाकलवरील चंदनाची ८ किलो लाकडे रस्त्यावर फेकून देऊन पळ काढला. याप्रकरणी सपोनि किरण बिडवे यांच्या फिर्यादीवरून आसिफखा व आरेफ खा या दोघांविरूद्ध पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांना हूल देऊन चंदनतस्करांचे पलायन
By admin | Updated: July 18, 2014 01:50 IST