शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्हा परिषदेसमोर निधीच्या खर्चाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 14:25 IST

मार्चअखेरपर्यंत हा निधी खर्च न झाल्यास तो शासनाला परत करण्याची नामुष्की ओढावणार आहे. 

ठळक मुद्देनिधी खर्चही मार्चअखेरची ‘डेडलाईन’ दोन्ही वर्षांतील खर्चाची टक्केवारी खूपच कमीसर्व विभागांची कसरत सुरू

औरंगाबाद : जिल्हा परिषदेला २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्राप्त झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यासाठी आता सर्वच विभागांची कसरत सुरू आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत तब्बल १६८ कोटी ४ लाख ६७ हजार रुपयांचा निधी अखर्चित आहे. मार्चअखेरपर्यंत हा निधी खर्च न झाल्यास तो शासनाला परत करण्याची नामुष्की ओढावणार आहे. 

जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर, अर्थ समितीचे सभापती विलास भुमरे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी मागील दोन महिन्यांपासून यंदा अखर्चित निधीपैकी एक रुपयाही व्यपगत होणार नाही, याबाबत सातत्याने सर्व विभागप्रमुख, सर्व गटविकास अधिकाऱ्यांना आढावा बैठकांच्या माध्यमातून सूचना दिल्या. त्यानुसार बहुतांशी कामांच्या निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या. 

अनेक कामांना प्रशासकीय, तांत्रिक मान्यता देण्यात आल्या. अनेक कामांच्या ‘वर्कआॅर्डर’ही दिल्या. काही कामांची बिले निकाली काढण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. एवढे सारे परिश्रम घेतल्यानंतरही फेब्रुवारीअखेरपर्यंत २०१७-१८ मध्ये जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या निधीपैकी सुमारे १६८ कोटी रुपये अखर्चित असल्याची बाब समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षातील निधीच्या खर्चाचीदेखील सारखीच परिस्थिती आहे. यंदा जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या २०३ कोटी १९ लाख ८१ हजार रुपयांपैकी आतापर्यंत अवघे ९७ कोटी ३ लाख १३ हजार रुपये खर्च झाले आहेत. अजूनही १०६ कोटी १६ लाख ६८ हजार रुपये शिल्लक आहेत.

याव्यतिरिक्त शासनाकडून मिळालेल्या हस्तांतरित आणि अभिकरण योजनांचा ९० कोटी ४९ लाख रुपयांच्या निधीपैकी ५५ कोटी १० लाख ८५ हजार रुपये खर्च झाले असून, ३५ कोटी ३८ लाख १५ हजार रुपये खर्चाविना पडून आहेत. विशेष घटक योजनेंतर्गत यंदा ७१ कोटी ६४ लाख २५ हजार रुपयांचा निधी मिळाला होता. त्यापैकी अवघे ५ कोटी ९८ लाख ८५ हजार रुपये खर्च झाले असून, ६५ कोटी ६५ लाख ४० हजार रुपये शिल्लक आहेत. जि.प. उपकराच्या निधीचीही अवस्था तशीच आहे. ५४ कोटी ६१ लाख ४४ हजार रुपयांपैकी अवघे १३ कोटी ९ लाख ५३ हजार रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत. ४१ कोटी ५१ लाख ९० हजार रुपये मार्चअखेरपर्यंत खर्च करावे लागणार आहेत.

‘सीईओ’च सादर करणार अर्थसंकल्पलोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आता केव्हाही लागू शकते. अद्यापही अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस काढण्यात आलेली नाही. नोटीस जारी केल्यानंतर सभेसाठी किमान १० दिवसांचा अवधी द्यावा लागतो.४ त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्यामार्फतच सादर करण्याविषयी जिल्हा परिषदेत हालचाली सुरू झाल्या असून, १९ किंवा २० मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होईल. दरम्यान, यास स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी कौर यांनीही दुजोरा दिला आहे.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधीgovernment schemeसरकारी योजना