शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मतविभाजन रोखणे आघाडीला आव्हान!

By admin | Updated: November 16, 2016 00:14 IST

जालना : जालना नगर पालिका ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने शस्त्रे परजली

जालना : जालना नगर पालिका ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने शस्त्रे परजली असून, मतविभाजन टाळण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात आले आहे. एकूणच आघाडीच्या नेत्यांनी शस्त्रे परजली असून, गुरुवारपासून खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडण्यास सुरुवात होणार आहे. जालना नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गत काही दिवसांत नाट्यमय घडामोडींना वेग आला. भाजपा आणि शिवसेनेने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर युतीने अपक्ष असलेल्या शकुंतला कदम यांना या पदासाठी उमेदवार म्हणून पुरस्कृत केले. त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांचा आत्मविश्वास दुणावला आहे. असे असले तरी अपक्ष उमेदवाराकडून मतांचे विभाजन होऊ नये, या दृष्टीने दोन्ही पक्षांच्या धुरिणांकडून निवडणुकीतील प्रचाराची रणनीती आखली जात आहे. जालना शहरात मुस्लिम आणि दलित मतांचा टक्का लक्षणीय आहे. याच आधारावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी राजकीय गणित जुळविली आहेत. तसेच पालिकेत गत पाच वर्षांत केलेली विकास कामे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले जात आहेत. सध्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकांतून आपापसातील मतभेद वा हेवेदावे बाजूला ठेवून एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले जात असले तरी दगाफटका होऊ नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना व भाजपाच्या पुरस्कृत उमेदवार शकुंतला कदम याही राजकीयदृष्ट्या अनुभवी असल्याने आघाडीचे नेते संधी घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. मतांचे गणित जुळविण्यात त्यांनीही सुरुवात केली असून, विविध राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. यातून समाजातील दलित व मुस्लिम बांधव आपल्याकडे खेचण्याचा त्यांचा प्रयत्न असून, यात त्यांना कितपत यश येते, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. संगीता गोरंट्याल आणि शकुंतला कदम यांच्यातच थेट लढत होण्याची चिन्हे असून, प्रचारात कोणते मुद्दे उपस्थित होतात. मतदारांना ते कितपत पटतात, यावर यशअपयशाचे गणित अवलंबून राहणार आहे. १७ नोव्हेंबर रोजी उमेदवारांना चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचारास सुरुवात होणार असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहे. त्यानंतर केवळ आठ दिवस प्रचाराचा झंझावात राहणार असून, उमेदवार प्रचारास सज्ज झाले आहेत.