शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पीक कर्ज मंजुरीसाठी विभागीय कार्यालयात माराव्या लागणार चकरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:16 IST

बँकांच्या विभागीय कार्यालयातून गृहकर्जास मंजुरी मिळत असते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र बँकेने एक निर्णय घेतला आहे. ज्या शाखेचे एनपीएचे (थकीत कर्ज) प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तेथे नवीन पीक कर्ज मंजुरीचा व्यवस्थापकांचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. असे कर्ज मंजुरीचे निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येणार आहेत. यामुळे कर्ज मंजुरीची गती वाढणार आहे, असा दावा बँकेने केला असला प्रत्यक्षात मात्र, शेतकऱ्यांना विभागीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार आहेत.

ठळक मुद्देनिर्णय : गृहकर्जाच्या धर्तीवर पीक कर्जही मंजूर होणार महाराष्ट्र बँकेच्या वरिष्ठ पातळीवरून

औरंगाबाद : बँकांच्या विभागीय कार्यालयातून गृहकर्जास मंजुरी मिळत असते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र बँकेने एक निर्णय घेतला आहे. ज्या शाखेचे एनपीएचे (थकीत कर्ज) प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तेथे नवीन पीक कर्ज मंजुरीचा व्यवस्थापकांचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. असे कर्ज मंजुरीचे निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येणार आहेत. यामुळे कर्ज मंजुरीची गती वाढणार आहे, असा दावा बँकेने केला असला प्रत्यक्षात मात्र, शेतकऱ्यांना विभागीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार आहेत.संपूर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळून निघाला आहे. शेतकरी तर हवालदिल झाले आहेत. तसेच यंदा मान्सूनचे भकीतही निराशाजनक असल्याचे सांगितल्या जात आहे. यामुळे बळीराजाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. त्यात नवीन पीक कर्जाचे प्रस्ताव सादर करणाऱ्यांना आता आपले बँकेचे व्यवहार चोख ठेवावे लागणार आहेत. नवीन पीक कर्ज मंजूर करणे पहिले शाखा व्यवस्थापकाच्या हाती होते. महाराष्ट्र बँकेने आता शाखा व्यवस्थापकाकडून ते अधिकार काढून घेतले आहेत व वरिष्ठ अधिकाºयांला अधिकार दिले आहेत. कारण, बँकेच्या म्हणण्यानुसार थकीत पीक कर्जाची संख्या वाढत आहे. यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. महाराष्ट्र बँकेच्या अहवालानुसार औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत मिळून ६३ शाखा आहेत. कृषी कर्जाची थकबाकी ३८९ कोटी ८३ लाख इतकी असून एनपीए २८.८३ टक्के एवढा आहे. लातूर विभागात १३७ कोटी ५९ लाख थकबाकी असून, एनपीएचे प्रमाण १८.२५ टक्के आहे. अकोला विभागात १२६ कोटी ४४ लाख रुपये थकबाकी असून, १८.२५ टक्के एनपीए आहे. जळगाव विभागात १०९ कोटी १९ लाख थकबाकी (एनपीए १५.०३ टक्के) आहे. यासंदर्भात मागील महिन्यात महाराष्ट्र बँकेची एक बैठक झाली. त्यात वाढत्या एनपीएचा मुद्दा गाजला होता. ज्या शाखांमध्ये १५ टक्क्यांपेक्षा अधिक एनपीए आहे, तेथील नवीन पीक कर्ज प्रकरणे विभागीय कार्यालयातून करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नवीन निर्णयामुळे खरीप हंगामात मराठवाडा व विदर्भातील कृषी कर्जाचा विषय चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक