शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विजय झोलचे केडन्स संघाविरुद्ध शतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:51 IST

मराठवाड्याचा शैलीदार फलंदाज विजय झोल याने शनिवारी झुंजार शतकी खेळी करताना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पुणे येथे सुरू असलेल्या सीनिअर सुपरलीग क्रिकेट स्पर्धेत कर्णधाराला साजेशी शतकी खेळी केली. त्याच्या या शतकी खेळीमुळे अध्यक्षीय एकादश संघाला पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यानंतरही केडन्सविरुद्ध ही लढत अनिर्णीत ठेवण्यात यश मिळवता आले. लातूरच्या अभिलाष लोखंडे याने ६ बळी घेत या सामन्यात आपला विशेष ठसा उमटवला.

ठळक मुद्देएमसीए सुपर लीग : लातूरच्या अभिलाष लोखंडेचे ६ बळी

औरंगाबाद : मराठवाड्याचा शैलीदार फलंदाज विजय झोल याने शनिवारी झुंजार शतकी खेळी करताना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पुणे येथे सुरू असलेल्या सीनिअर सुपरलीग क्रिकेट स्पर्धेत कर्णधाराला साजेशी शतकी खेळी केली. त्याच्या या शतकी खेळीमुळे अध्यक्षीय एकादश संघाला पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यानंतरही केडन्सविरुद्ध ही लढत अनिर्णीत ठेवण्यात यश मिळवता आले. लातूरच्या अभिलाष लोखंडे याने ६ बळी घेत या सामन्यात आपला विशेष ठसा उमटवला.केडन्स संघाने अध्यक्षीय एकादश संघाला पहिल्या डावात १११ धावांत गुंडाळले. अध्यक्षीय संघाकडून अविनाश शिंदेने सर्वाधिक ३७ धावा केल्या. केडन्सकडून इझान सय्यदने ३५ धावांत ५ गडी बाद केले. त्यानंतर प्रत्युत्तरात केडन्सने पहिल्या डावात २८१ धावा करीत १७० धावांची आघाडी घेतली. त्यांच्याकडून अक्षय वाईकरने ८४, पारस रत्नपारखीने ४८, प्रयाग भाटीने ४० व कर्णधार हर्षद खडीवालेने ३० धावा केल्या. अध्यक्षीय एकादशकडून लातूरच्या अभिलाष लोखंडे याने ८५ धावांत ६ गडी बाद केले. हिंगोलीच्या सन्नी पंडितने ८१ धावांत २ बळी घेतले. पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यानंतर कर्णधार विजय झोलच्या शतकी खेळीच्या बळावर अध्यक्षीय संघाने दुसऱ्या डावात ९ बाद २८९ धावा करीत केडन्सला निर्णायक विजयापासून रोखण्यात यश मिळवले. २ बाद २४ अशी परिस्थिती असताना विजय झोलने आॅस्टीन लॉजरीस याच्या साथीने निर्णायक ठरणारी दुसºया गड्यासाठी ११२ धावांची भागीदारी केली. विजय झोलने १४४ चेंडूंना सामोरे जाताना १६ खणखणीत चौकारांसह ११७ धावांची खेळी केली. विशेष म्हणजे या सत्रातील विजय झोलचे केडन्सविरुद्ध दुसरे शतक आहे. विजय झोल याच्याशिवाय ऋषिकेश सोनवणे याने ७२, आॅस्टीन लॉजरीसने ४९ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. केडन्सकडून समद फल्लाह व अक्षय वाईकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.संक्षिप्त धावफलकअध्यक्षीय एकादश संघ (पहिला डाव) : ३२ षटकांत सर्वबाद १११. दुसरा डाव : ९ बाद २८९. (विजय झोल ११७, ऋषिकेश सोनवणे ७२, आॅस्टीन लॉजरीस ४९. समद फल्लाह ३/५७, अक्षय वाईकर ३/६७).केडन्स (पहिला डाव) : ६१.३ षटकांत सर्वबाद २८१. (अक्षय वाईकर ८४, पारस रत्नपारखी ४८, प्रयाग भाटी ४०, हर्षद खडीवाले ३०. अभिलाष लोखंडे ६/८५, सन्नी पंडित २/८१).