शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

चिकलठाणा विमानतळाचा 'कृषी उडान- २.०' मध्ये समावेशासास केंद्र सरकार सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 18:38 IST

Aurangabad International Airport : चिकलठाणा विमानतळाचा या योजनते समावेश झाला तर औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतीमाल देशाच्या विविध बाजारपेठेत कमी वेळेत पोहचेल.

औरंगाबाद : शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा म्हणून शेतमाल (कृषी उत्पादन) कमीत कमी वेळेत देशातील विविध बाजारपेठांमध्ये वेळेवर पोहोचावे याकरिता चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा (Aurangabad International Airport ) कृषी उडान-२.० ( Krushi Uddan Scheme ) योजनेत समावेश करण्याबाबत सकारात्मक असल्याचे केंद्रिय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia ) यांनी एका पत्राद्वारे कळवले आहे. याबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक सल्लागार समितीचे सदस्य तथा खासदार इम्तियाज जलील ( Imtiaz Jalil ) यांनी मागणी केली होती. जर समावेश झाला तर या निर्णयाचा मोठा फायदा औरंगाबाद जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला होणार आहे.  औरंगाबाद जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होत असून उत्पादनात झपाट्याने वाढ होत आहे. देशातील इतर बाजारपेठेत येथील शेतमाल कमीतकमी वेळेत पोहचविण्याची व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना मालाचा योग्य मोबदला मिळत नाही. यात मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागते. यासाठी शेतमालाची कमीतकमी वेळेत हवाई मार्गाने वाहतूक करणे आवश्यक आहे, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना दिनांक ०५ डिसेंबर २०२१ रोजी दिलेल्या पत्रातून केली होती. याबाबत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कृषी उडान योजनेत औरंगाबादसह मराठवाड्याचा समावेश करण्याच्या व्यवहार्यतेचा भविष्यात नागरी विमान वाहतूक मंत्रालय सकारात्मक विचार करणार असल्याचे खा. जलील यांना कळविले आहे. चिकलठाणा विमानतळाचा या योजनते समावेश झाला तर औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतीमाल देशाच्या विविध बाजारपेठेत कमी वेळेत पोहचेल. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळण्यास मदत होईल.

काय आहे कृषी उडान योजना २.०कृषी उत्पादन योजना १.० ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मार्गावर शेतकऱ्यांना कृषी उत्पादनांच्या वाहतुकीत मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. जेणेकरून अनेक मूल्यांची प्राप्ती सुधारू शकेल. ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरू करण्यात आलेली, कृषी उडान योजना २.० मध्ये डोंगराळ भाग, ईशान्येकडील राज्ये आणि आदिवासी भागातील नाशवंत मालवाहू उत्पादनांच्या वाहतुकीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या योजनेचा उद्देश सर्व कृषी उत्पादनांसाठी, विशेषत: देशाच्या ईशान्य, डोंगराळ आणि आदिवासी भागातून उद्भवलेल्या सवलतीच्या, विनाव्यत्यय आणि वेळेनुसार हवाई वाहतूक सुनिश्चित करणे हा आहे.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळImtiaz Jalilइम्तियाज जलील