शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ सत्तेचा केंद्रबिंदू पैठणकडे; प्रतिष्ठान महाविद्यालयातील प्राध्यापकांचे वर्चस्व

By राम शिनगारे | Updated: October 12, 2023 12:51 IST

व्यवस्थापन परिषद, अधिसभेवर प्रत्येकी दोन सदस्य तर विद्या परिषदेत तीन सदस्य

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध महत्त्वाच्या प्राधिकरणांवर पैठणच्या प्रतिष्ठान महाविद्यालयातील प्राध्यापकांनी वर्चस्व निर्माण केले आहे. त्याशिवाय याच महाविद्यालयातील प्राध्यापकांचेही विविध प्राध्यापक संघटनांवरही प्रभुत्व आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या सत्तेचा केंद्रबिंदू पैठणकडे सरकला असल्याचे स्पष्ट झाले.

विद्यापीठाच्या सर्वाधिक महत्त्वाच्या व्यवस्थापन परिषदेसह अधिसभेवर प्रतिष्ठानमधील नितीन जाधव हे संस्थाचालक गटातून बिनविरोध निवडून आले. विद्या परिषदेच्या महिला गटातून डॉ. अपर्णा पाटील यांनी सर्वाधिक मते मिळवून व्यवस्थापन परिषदेत स्थान मिळवले. तत्पूर्वी, त्या हिंदी अभ्यास मंडळाच्या कुलगुरू नियुक्त सदस्य व तेथून अध्यक्ष बनल्या. अधिसभेत डॉ. उमाकांत राठोड यांनी अपक्ष निवडणूक लढवत बाजी मारली. विद्या परिषदेच्या निवडणुकीत डॉ. राजेश करपे यांनी विक्रमी १४९५ प्राध्यापकांची मते मिळवून तब्बल १ हजार ७५ मतांच्या फरकाने विजय प्राप्त केला. डॉ. सर्जेराव जिगे हे मराठी भाषा अभ्यास मंडळाचे कुलगुरू नियुक्त सदस्य बनले, तेथून अध्यक्षही झाले. या महत्त्वाच्या प्राधिकरणांशिवाय डॉ. दीपक भुसारे हे अर्थशास्त्र, डॉ. ज्ञानोबा कसाब मत्स्यशास्त्र आणि डॉ. ज्ञानेश्वर देशमुख हे प्राणिशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य बनले आहेत. एकाच महाविद्यालयातील तब्बल सात प्राध्यापक व्यवस्थापन परिषद, अधिसभा, विद्यापरिषद, अभ्यास मंडळांचे अध्यक्ष आणि सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्याच वेळी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठ महाविद्यालयांतून फक्त तीन विद्या परिषद, तर एक व्यवस्थापन परिषदेचा सदस्य आहे.

प्राध्यापक संघटनांवरही वर्चस्वप्रतिष्ठान महाविद्यालयातील प्राध्यापकांचे विविध प्राध्यापक संघटनांवरही वर्चस्व आहे. भाजप संबंधित विद्यापीठ विकास मंचचे डॉ. सर्जेराव जिगे निमंत्रक आहेत. डॉ. उमाकांत राठोड बामुक्टो संघटनेचे जिल्हाध्यक्ष असून, प्रबळ अशा उत्कर्ष ग्रुपचे मागील पाच वर्षांत डॉ. राजेश करपे यांनी व्यवस्थापन परिषदेत नेतृत्व केले आहे.

नेते उदंड; पण पदक एकचनुकत्याच झालेल्या विद्यापीठाच्या युवा महोत्सवात प्रतिष्ठानच्या संघाला १२२ पारितोषिकांपैकी फक्त वक्तृत्व स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे एकमेव पारितोषिक मिळाले. या महाविद्यालयात तब्बल ३ हजार विद्यार्थी संख्या असून, ३० प्राध्यापक कार्यरत असताना एकच पदक मिळाले, हे विशेष.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र