शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

माणगाव परिषदेचे शताब्दी वर्ष विद्यापीठ साजरे करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:52 IST

कोल्हापूरमधील माणगाव येथे १९२० मध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी आयोजित सभेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची देशपातळीवर ओळख झाली. या ऐतिहासिक घटनेचे शताब्दी वर्ष कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ आणि येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संयुक्तरीत्या साजरे करणार आहे, अशी माहिती कुलगुरू देवानंद शिंदे यांनी गुरुवारी (दि.१३) पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देविद्यापीठ : १९२० ला शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची झाली होती सभा

औरंगाबाद : कोल्हापूरमधील माणगाव येथे १९२० मध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी आयोजित सभेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची देशपातळीवर ओळख झाली. या ऐतिहासिक घटनेचे शताब्दी वर्ष कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ आणि येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संयुक्तरीत्या साजरे करणार आहे, अशी माहिती कुलगुरू देवानंद शिंदे यांनी गुरुवारी (दि.१३) पत्रकार परिषदेत दिली.राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे होते. १९२० ला कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथे शाहू महाराजांनी मागासवर्गीयांची परिषद आयोजित केली होती. या परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रथमच शाहू महाराजांनी, ‘मागासवर्गीयांनो तुम्हाला तुमचा नेता मिळाला’ असे सांगून बाबासाहेब हे देशाचे नेते आहेत असे त्यांच्या भाषणातून जाहीर केले. या ऐतिहासिक घटनेचे हे शताब्दी वर्ष आहे. हे वर्ष कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ आणि येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संयुक्तरीत्या साजरे करणार आहे. या माध्यमातून दोन्ही विद्यापीठे विविध उपक्रम राबवून महापुरुषांना अभिवादन करतील, अशी माहिती कुलगुरू देवानंद शिंदे यांनी दिली.परिषदेची माहिती व्यापक व्हावीमाणगाव परिषद ही घटना मोठी असून, याबद्दल पुरेसे बोलले जात नाही. यानंतरच खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा घटनाकार म्हणून उदय झाला. नव्या पिढीला याची माहिती व्हावी, या घटनेची व्यापकता वाढून प्रबोधन व्हावे या हेतूने दोन्ही विद्यापीठे हे शताब्दी वर्ष साजरे करणार असल्याचेही कुलगुरू शिंदे यांनी सांगितले.व्यवस्थापन सुधार हेच लक्षविद्यापीठातील शिक्षक-विद्यार्थी, कर्मचारी- अधिकारी यात सुसंवाद व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे कुलगुरू शिंदे यांनी सांगितले. तसेच सध्या सुरू असलेल्या सीईटी आणि त्यानंतर प्रवेश प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडणे हे मुख्य काम आहे. विद्यापीठात विद्यार्थी हे केंद्रस्थानी असून, शिक्षक हा गाभा असून येथील बौद्धिक संपदेचा योग्य वापर करण्यासंदर्भात योग्य निर्णय घेण्यात येतील. विविध विभागातील रिक्त पदांवर सीएसबीवरील प्राध्यापकांच्या नियुक्त्या प्राधान्याने करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. यासोबतच विद्यार्थिनी वसतिगृहातील अडचणी स्वत: जाऊन पाहणार असल्याची माहितीसुद्धा कुलगुरू शिंदे यांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रuniversityविद्यापीठ