शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी

By admin | Updated: July 30, 2014 01:01 IST

जालना : जिल्ह्यात मंगळवारी ईद-उल-फितर उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त मुस्लिम बांधवांनी सर्व मशिदींसह ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज अदा केली.

जालना : जिल्ह्यात मंगळवारी ईद-उल-फितर उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त मुस्लिम बांधवांनी सर्व मशिदींसह ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज अदा केली. सकाळपासूनच विविध भागातील मशिदींमध्ये नवीन पेहराव केलेले मुस्लिम बांधव नमाज अदा करण्यासाठी जात होते. यात बच्चे कंपनींचाही मोठा सहभाग होता. तरूण, वृद्ध मंडळींचे घोळके प्रसन्न मुद्रेत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ईद-उल-फितरचा आनंद होता.कदीम जालना ईदगाहमध्ये मौलाना गुफरान यांनी नमाज पठण केले. त्यांनी विश्वशांती, बंधुभाव यासाठी अल्लाहकडे प्रार्थना केली. उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांनीही प्रार्थना केली. तत्पूर्वी एकबाल पाशा यांनी इस्त्रायलच्या निषेधाचा ठराव मांडला. सदर बाजार ईदगाहमध्ये मौलाना मोईन शाह नवाज यांनी नमाज पठण केले. तसेच गांधीनगर ईदगाहमध्ये मुफ्ती शकील यांनी नमाज पठण केले. तत्पूर्वी पुण्याचे मौलाना हाफिज मंजूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेरसवार दर्गा, मियाँसाब दर्गा, जुम्मा मशीद, उस्मानिया मशीद, फारूक अब्दुल्ला मशीद, युसुफिया मशीद आदी ठिकाणी नमाज अदा केली. उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.यावेळी आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, माजी आ. अरविंद चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल हाफिज, उपनगराध्यक्ष शाह आलमखान, अप्पर पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, तहसीलदार जे.डी. वळवी, शब्बीर अन्सारी, डॉ. मोहम्मद बद्रोद्दीन, फेरोज मौलाना, जमील मौलाना, रशीद पहेलवान, बदर चाऊस, शेख महेमूद, गणेश सुपारकर, बाबूराव सतकर, नगरसेवक अकबरखान, नूरखान, मो. कासीम बावला, मो. इफ्तेखारोद्यीन, सत्संग मुंढे, अलीम कुरैशी, मोहन इंगळे, कलीमखाँ पठाण, वाजेदखान, अय्यूबखान, फेरोजलाला तांबोळी, आलमखान पठण, जहीर सौदागर, माजेदखान, शेख आरेफ, तय्यब देशमुख, मिर्झा अन्वर बेग, मिर्झा अफसर बेग, नवाब डांगे, याकूब कच्छी, शेख सलीम, अब्दूल रफिक, शेख गयासोद्दीन, अ‍ॅड. सोहेल सिद्दीकी, अ‍ॅड. सय्यद तारेख, लतीफोदीद्दीन कादरी, बासेद कुरैशी, अ‍ॅड. शेख इसाक, अ‍ॅड. मुजम्मील, हफिजुल्ला दुर्राणी, सुधाकर निकाळजे, फेरोज बागवान, महेमुद कुरैशी, जुमान चाऊस, अख्तर दादामियाँ, शकीलखान, सय्यद सऊद, अ‍ॅड. अर्शद बागवान, सगीर अहेमद, कादर फुलारी, रहिम तांबोळी, शमीम जौहर, जुबेर खान, बरकतुल्ला हुसैन, प्रा. वाहब कुरैशी, रशीद फुलारी, आयाजखान पठाण, अहेमद चाऊस, नाहदी चाऊस आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)पावसासाठी केली अल्लाहकडे प्रार्थना जिल्ह्यात सर्व मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी विश्वशांती, बंधूभाव आणि पावसासाठी मनोभावे प्रार्थना केली. पावसाचे प्रमाण सद्यस्थितीत कमी असून त्यामुळे टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाऊस पडावा, अशी प्रार्थना विविध ठिकाणी करण्यात आली. जालना शहरातील सदर बाजार व कदीम जालना ईदगाहमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असल्याने वाहतूक शाखेच्या पोलिसांनी काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी थांबविली होती. याशिवाय सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.