शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

पाण्यासाठी सिडकोचे अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 22:28 IST

पाणी प्रश्नावर सिडको वाळूज कार्यालयात गुरुवारी आयोजित बैठकीत संतप्त नागरिकांनी सिडकोच्या अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

वाळूज महानगर: पाणी प्रश्नावर सिडको वाळूज कार्यालयात गुरुवारी आयोजित बैठकीत संतप्त नागरिकांनी सिडकोच्या अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

सिडको वाळूज महानगर १ व २ मधील अनेक नागरी वसाहतींना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. आठवड्यातून दोनवेळा तेही कमी दाबाने पाणी मिळत असल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे काही वसाहतींना मागणीनंतरही प्रशासनाकडून नळजोडणी दिली जात नाही. त्यामुळे रहिवाशांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे म्हाडा कॉलनी, राज स्वप्नपूर्ती, फुलोरा, सारा व्यंकटेश, स्रेहवाटिका, सिद्धीविनायक विहार, ग्रोथ सेंटर आदी भागांतील नागरिकांमधून प्रशासनाविषयी रोष व्यक्त केला जात आहे. नागरिकांचा वाढता रोष लक्षात घेवून सिडको प्रशासनातर्फे पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी सायंकाळी सिडको वाळूज कार्यालयात बैठक घेण्यात आली.

यात नागरिकांनी पाणी प्रश्नाबरोबरच इतर नागरी समस्यांचा पाढा वाचला. किमान पाणी तरी द्या, अशी मागणी केली. बैठकीला नागेश कुठारे, प्रभाकर धोत्रे, रामेश भांबरे, राम शिंदे, दादा मिसाळ, दीपक भुतेकर, विजय कसबे, आबाजी गाणार, सुशिल सावंत, विकास रहाणे, संदीप रोडे, सुधाकर भिसे, संकेत डुंबरे, सरोज बावीस्कर, नयना पवार, कल्पना पवार, अर्चना औताडे, सुजाता रहाणे, रत्ना गायके, वंदना शिंदे, विजया पाटील आदींसह शंभरपेक्षा अधिक महिला-पुरुषांची उपस्थिती होती.

अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्तीसिडकोचे अधीक्षक अभियंता सुधाकर विसाळे व उप अभियंता दीपक हिवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत नागरिकांनी म्हाडा कॉलनी, राज स्वप्नपुर्ती, फुलोरा, सारा व्यंकटेश, स्रेहवाटिका, सिद्धीविनायक विहार, ग्रोथ सेंटर आदी नागरी वसाहतींना कमी दाबाने पाणी मिळत असल्याची तक्रार मांडली. तसेच सिडकोच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत नागरी समस्यांचा पाढाच वाचला. सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी महानगर १ व २ मध्ये नवीन दोन जलकुंभ उभारावेत, अशी मागणी करण्यात आली.

टॅग्स :Walujवाळूजcidco aurangabadसिडको औरंगाबाद