औरंगाबाद : प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मध्यवर्ती बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी वायरिंग करण्यात आली. त्या पलीकडे काहीही झालेले नाही. या ठिकाणी अद्ययावत बसस्थानक बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे बसस्थानकाचे काम पूर्ण होईपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार नाहीत का? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बहुतांश शासकीय कार्यालयांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. यामुळे गुन्हेगारांना वचक राहतो. मध्यवर्ती बसस्थानकात चोरट्यांचा वावर असल्याने प्रवाशांच्या बॅग्ज, पाकिटे, दुचाकी आदींची चोरी वाढली आहे. संशयित व्यक्ती, वाहन आणि अन्य वस्तूंबाबत सतर्क राहून त्याबाबत तात्काळ पोलिसांना कळविण्यात यावे, यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात नुकताच जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळीही सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रश्न उपस्थित झाला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे अशा घटनांना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जातो; परंतु सीसीटीव्ही कॅ मेरे बसविण्याक डे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी बसस्थानकात जवळपास ३५ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी वायरिंग करण्यात आली. कॅमेरे तर बसलेच नाहीत. मात्र, आता ही वायरिंगही खराब होत आहे.दलालांवर नियंत्रणबसस्थानकात आलेले प्रवासी पळविणाऱ्या दलालांचा प्रश्नही भेडसावत आहे. अशा दलालांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत महत्त्वाची ठरू शकते. निविदा प्रक्रियाबसस्थानकाच्या जागेवर बीओटी तत्त्वावर अद्ययावत आणि सुसज्ज बसस्थानक बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे. ती पूर्ण होऊन २०१५ मध्ये प्रत्यक्षात काम सुरू होण्याची शक्यता आहे. शिवाय काम पूर्ण होण्यासही मोठा कालावधी लागणार आहे.याबाबत मध्यवर्ती बसस्थानकातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची केवळ वायरिंग झालेली आहे; परंतु प्रत्यक्षात कॅमेरे बसविण्यात आले नाहीत. त्याचे कारण माहिती नाही.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फक्त वायरिंग
By admin | Updated: July 31, 2014 01:24 IST