महाशिवरात्रीनिमित्त तालुक्यात गस्त घालत असताना मंगरुळ फाट्याजवळ ट्रक (एमएच २१ एबी ००९० आणि एमएच २३ डब्ल्यू ९८४८) वाळू भरुन जळगावकडे जात होते. पोलिसांनी ट्रकमधील वाळूबाबत रॉयल्टीची विचारणा केली असता त्यांच्याकडे रॉयल्टी नसल्याचे पुढे आले. यामुळे दोन्ही ट्रकमधून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याचे समोर आले. याबाबत चालकांना विचारणा केली असता त्यांनी मेरखेडा (ता. भोकरदन) येथील पूर्णा नदीतून वाळू भरुन उंडणगाव (ता. सिल्लोड) येथे नेत असल्याचे सांगितले. पोलिसांनी ट्रकमधील प्रत्येकी ५ ब्रास वाळू, दोन ट्रक असा एकूण २० लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करत पोलीस कॉन्स्टेबल सतीष पाटील यांच्या फिर्यादीवरून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
-- कॅप्शन : अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी जप्त करण्यात आलेला ट्रक सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत.