मंगळवारी सायंकाळी प्लास्टिकचे साहित्य व्यापाऱ्यांना पुरवठा करण्यासाठी श्रीरामपूर येथून टेम्पो (क्र. एमएच १४ ईएम ५५१८) पैठण शहरात दाखल झाला. दरम्यान, नगर परिषदेचे पथक प्रमुख मुकुंद महाजन, अशोक पगारे, खलील धांडे, राजू पगारे, राम कांदवणे यांनी हटकले असता टेम्पोत प्लास्टिक असल्याचे चालकाने सांगितले. यामुळे संबंधित टेम्पो जप्त करून नगर परिषद कार्यालयात नेण्यात आला. याप्रकरणी टेम्पोचालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे मुकुंद महाजन यांनी सांगितले.
बिनबोभाट वापर
शहरात सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर अन्नपदार्थ, भाजी, फळे, किराणा, बेकरी, अंडी, मासे-मटण आदी देण्याकरिता केला जात आहे. मोठ्या संख्येने प्लास्टिकचा साठा व त्याची घाऊक विक्री, तसेच दैनंदिन वापर बिनबोभाट सुरू असल्याचे चित्र पैठण शहरात सध्या दिसून येत आहे.
फोटो आहे.